घरताज्या घडामोडीआत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणीला पोलिसांनी वाचविले

आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणीला पोलिसांनी वाचविले

Subscribe

घरगुती भांडणातून आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या एका 20 वर्षांच्या तरुणीला अंधेरी पोलिसांनी आपल्या जिवाची पर्वा न करता वाचविले. या तरुणीची समजूत काढून तिला तिच्या पालकांसोबत सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांनी सांगितले. नम्रता ही 20 वर्षांची तरुणी अंधेरीतील सहार रोड, कोलडोंगरी परिसरात राहत असून ती सध्या कॉलेजमध्ये शिकते. शुक्रवारी तिचा तिच्या पालकांशी क्षुल्लक घरगुती कारणावरून वाद झाला होता, या वादानंतर ती रागाच्या भरात घरातून बाहेर पडली.

काही वेळानंतर ती त्याच परिसरातील तिरुपती इमारतीच्या टेरेसवर गेली, तेथून ती आत्महत्येच्या प्रयत्नात होती. ही माहिती पश्चिम नियंत्रण कक्षातून प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पोलीस शिपाई प्रविण जाधव, रमेश भिंगदिवे, विजय थिटे, सोनिया साळवी यांनी तिथे धाव घेतली होती. बीट मार्शल प्रविण जाधव, रमेश भिंगदिवे, सोनिया साळवी यांनी तिला बोलण्यात गुंतवून आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्याच्या टाकीच्याा कथड्यावरून बाजूला ओढले.

- Advertisement -

तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथक पोलीस ठाण्यात आले. तिच्या चौकशीनंतर तिचा तिच्या पालकांसोबत किरकोळ घरगुती कारणावरून वाद झाला होता, या वादानंतर ती आत्महत्या करण्यासाठी तिरुपती इमारतीमध्ये आली होती. मात्र, स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच अंधेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणीला वाचविले. तिची समजूत काढल्यानंतर तिला तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे. तसेच तिची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -