Pollution : खोपोलीला प्रदूषणाचा विळखा ; कारखानदारांच्या मनमानी कारभार

साजगाव पचंक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक

Pollution: Pollution in the skull; Arbitrary management of manufacturers,
Pollution : खोपोलीला प्रदूषणाचा विळखा ; कारखानदारांच्या मनमानी कारभार

खालापूर तालुक्यातील साजगाव, होनाड, आत्करगाव ग्रामपचांयत हद्दीमधील प्रसोल केमीकल, कमानी ऑईल, जयसिगं अलॉईज, विनस वायरसारख्या कारखान्यांतून परिसरातील नदी, नाले, तसेच हवेचे प्रदूषण बिनबोभाटपणे केले जात असून, यात अनेकांची शेतीही नष्ट झाली आहे. विशेष म्हणजे आत्करगावात रसायनमिश्रीत पाणी येत आहेत. याबाबत संबंधित अधिकारी आणि स्थानिक नेतेमंडळी मूग गिळून गप्प असल्याने कारखानदारांच्या मनमानी विरोधात आक्रमक धोरण स्वीकरण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

आत्करगाव ग्रामपचांयत हद्दीमध्ये येऊ घातलेल्या कपंनीची जनसुनावणी येत्या १७ नोव्हेंबर रोजी आहे. त्यामध्ये शासनाने सादर केलेला कपंनीचा डेमो पाहून जी कपंनी प्रदूषण किंवा जैविक कचरा नष्ट करण्यासाठी आहे त्या कंपनीबाबत अभ्यास न करताच ठेकेदारी करणारे नेते स्वार्थासाठी विरोध करीत आहेत. विनस वायर कपंनीमुळे परिसरातील जमीन रसायनमिश्रीत झालेली आहे. भूगर्भातील पाण्यात रसायन आहे. त्यामुळे बोअरवेल आणि विहिरींचे पाणी वापरता येत नाही. झाडांना फळे आणि फुलेही येत नाहीत. या प्रदूषणकारी विनसमध्ये गावातील पुढार्‍यांची ठेकेदारी चालते आणि हेच पुढारी भविष्यात येऊ घातलेल्या एसएमएस कपंनीला केवळ स्वार्थापोटी विरोध करीत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते नितीन तवले आणि नितीन पाटील, तसेच ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत मांडले.

जैविक कचरा निवारण करणार्‍या एसएमएस कंपनीमुळे ग्रामस्थांना रोजगार आणि ग्रामपचांयतीला सुविधा मिळणार असतील तर नक्कीच आम्ही कारखान्यांचे स्वागत करू आणि साजगाव पचंक्रोशीतील प्रदूषणकारी कारखान्यांच्या विरोधात यापुढे लढाई चालूच ठेवू, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

वार्ताहर :- सारीका सावंत


हे ही वाचा – ‘फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती’; विक्रम गोखलेंचा दावा