Post Covid Symptoms: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या पित्ताशयाला सूज, डॉक्टरही हैराण

पोस्ट कोव्हिड नंतर यकृत,स्वादुपिंड, लहान आतडे, पित्ताशय पिशवी यांना हानी पोहचत असल्याची डॉक्टरांची माहिती

Post Covid Symptoms:Inflammation of the gallbladder of patients who have recovered from the corona
Post Covid Symptoms: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या पित्ताशयाला सूज, डॉक्टरही हैराण

आजपर्यंत अनेक जणांना कोरोनाची लागण. अनेकजण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतर ही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पोस्ट कोव्हिडनंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस सारख्या समस्या असताना आता आणखी समस्या समोर आलया आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या पित्ताशयाला सूज आली आहे. हे पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. राजधानी दिल्लीत एका ४८ वर्षीय महिलेच्या पित्ताशयाला सूज आल्याचे समोर आले आहे. ही महिला कोरोना संक्रमित झाल्याने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर तिच्या पित्ताशयाला सूज आल्याचे समोर आले. डॉक्टरांनी महिलेची योग्य तपासणी केली असता तिला मुतखड्यासंदर्भातील कोणताच त्रास नव्हता. मुतखड्याची समस्या असल्यास पित्ताशयाच्या छोट्या आतड्यातील ट्यूब ब्लॉक होतात. मात्र या महिलेला असा कोणताही त्रास नव्हता. हे पोस्ट कोव्हिडने झाले असल्याचे शक्यता आहे. या प्रकारामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत.

रुग्णालयातील डॉक्टर आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर महिलेच्या पित्ताशयाला आलेली सूज समोर आली नसती तर पुढे जाऊन महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. कोरोनातून बरे झाल्यानंतर समोर येणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. सुरुवातीच्या काळात कोरोनामुळे फुफ्फुसांचा धोका निर्माण होते असे वाटत होते मात्र कोरोनाचा प्रभाव आता शरीरातील अनेक भागात होत आहे. यकृत,स्वादुपिंड, लहान आतडे, पित्ताशय पिशवी यांना हानी पोहचत आहे. पोस्ट कोव्हिडनंतर समोर येणारी प्रकरणे पाहून डॉक्टरही हैराण असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयातील पोस्ट कोव्हिड रुग्णांच्या गुदाद्वारमधून रक्त येण्याचा समस्या समोर आल्या आहेत. कॅन्सर, एड्स सारख्या पिडीत रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होत आहे. मेंदूपासून किडनी पर्यंत कोरोनाचा प्रभाव होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. दिल्लीच्या आकाश हेल्थकेअर मध्ये ५० रुग्ण आहेत. ज्यांना पोस्ट कोव्हिडनंतर कोलाइटिस, कोलन अल्सर आणि यकृताशी संबंधित आजार झाले आहेत. त्यामुळे कोरोनातून बाहेर आल्यानंतर कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करु नका,असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – अमेरिकेत प्राण्यांनाही कोरोनोची लस