घरताज्या घडामोडीभेंडी बाजारात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे पोस्टर्स पायदळी

भेंडी बाजारात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे पोस्टर्स पायदळी

Subscribe

रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी

फ्रान्सच्या नीस शहरात झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबई, ठाण्यात उमटले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात पायदळी तुडवण्यात आले. रझा अकादमीकडून हे पोस्टर लावण्यात आले होते. तर ठाण्यातही मुस्लिमांनी फ्रान्सच्या विरोधात आंदोलन केले. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘मुंबईतील भेंडी बाजार येथे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे फोटो रस्त्यांवर लावून भ्याड निदर्शने करणार्‍या रजा अकादमीचे हे कृत्य देशद्रोही अशा स्वरूपाचेच आहे. दहशतवादाविरुद्ध बोलणार्‍या व्यक्तीचा अशा प्रकारे निषेध करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि त्यांना तात्काळ अटक करा,’ अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. त्याचबरोबर रझा अकादमीवर बंदी घालण्याची हिंमत राज्य सरकारने दाखवावी, असे आव्हानच भातखळकर यांनी सरकारला दिले आहे.

- Advertisement -

शिवसेनेची भूमिका काय?, भातखळकरांचा सवाल
फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आज चीनकडून होत असलेल्या कुरघोड्यांना सडेतोड उत्तर देणार्‍या भारतासोबत फ्रान्स खांद्याला खांदा लावून उभा आहे. अशावेळी फ्रान्सच्या प्रधानमंत्र्यांविरुद्ध महाराष्ट्रात रझा अकादमीचे लोक निदर्शने करत आहेत. याविषयी शिवसेनेची भूमिका काय?, असा सवाल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. त्याचबरोबर चीनमध्ये इतके दिवस मुस्लीम समाजावर अन्याय होत असताना रझा अकादमी गप्प का? असाही प्रश्न भातखळकर यांनी विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -