घरताज्या घडामोडीमहाडमधील प्रसोल केमिकल्स कारखाना बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

महाडमधील प्रसोल केमिकल्स कारखाना बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

Subscribe

महाडमधील प्रसोल केमिकल्स कारखाना बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

महाडमधील आमशेत गावात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील प्रसोल केमिकल्स हा कारखाना बंद करण्यात आला आहे. पिण्याचे पाणी प्रदूषित केल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने एका केमिकल्स कारखान्यावर कारवाई केली आहे. महाड औद्योगिक वसाहतीत प्रदूषण प्रतिबंधक क्षेत्रात, प्रदूषण नियंत्रणाची आवश्यक ती यंत्रणा उभी करण्याची सर्शत परवानगी या कारखान्याला देण्यात आली होती.मात्र अशी कोणतीही यंत्रणा या कारखान्याने उभी केली नाही. परिणामी या कारखान्याचे सांडपाणी आमशेत गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळले. त्यामुळे कारखान्यालगत असलेल्या आमशेत या गावातील बोअरवेल्स दूषित झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या प्रकरणी आमशेतच्या ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. या ग्रामस्ठांच्या तक्रारीची दखल घेउन ८ जानेवारी २०२१ ला प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष कारखान्याची तपासणी केली. त्यावेळेस प्रदूषण नियंत्रणासाठी कोणत्याही उपाययोजना या केमिकल कंपनीने केल्या नसल्याचे आढळले. कंपनी व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीसबजावण्यात आली होती. परंतु, त्यानंतरही कारखान्याने उपाययोजना केल्या नसल्याचे आढळून आले. त्यामुळे ९ ऑगस्ट २०२१ ला कारखान्याची प्रक्रिया बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक मंडळाचे अधिकारी व्ही.व्ही. कल्याणकर यांनी दिली. कारखान्याचा वीजपुरवठा आणि पाणी पुरवठा खंडीत करून हा कारखाना चार दिवसांपूर्वी बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – India Corona Updates: चिंता वाढतेय! जगभरात २४ तासांत सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद भारतात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -