घरक्राइमपंतप्रधानांच्या सुरक्षेतील ब्लॅक कॅट कमांडोची हत्या करणारा आरोपी चकमकीत ठार

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ब्लॅक कॅट कमांडोची हत्या करणारा आरोपी चकमकीत ठार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील ब्लॅक कॅट कमांडोची हत्या करणाऱ्या आरोपीचा चकमकीत मृत्यू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील ब्लॅक कॅट कमांडोची हत्या करणारा आरोपी चकमकीत ठार झाला आहे. पीएम सिक्युरिटीमध्ये तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांच्या ब्लॅक कॅट कमांडोची हत्या करण्यात आली. त्यादरम्यान, दिल्ली आणि युपी पोलिसांनी गोळीबार करत आरोपीला शरण येण्याचा इशारा दिला. मात्र, आरोपीकडून पोलीस पथकावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात ब्लॅक कॅट कमांडोची हत्या करणारा आरोपी जखमी झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील ब्लॅक कॅट कमांडोची हत्या करणाऱ्या आरोपीचे जावेद नाव असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार; उत्तर प्रदेशच्या ठाना क्षेत्रात चकमक झाली. या चकमकीत ब्लॅक कॅट कमांडोची हत्या करणारा जावेद गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

ब्लॅक कॅट कमांडो म्हणजे काय?

देशाचे सर्वात खतरनाक कमांडो म्हणजे ‘ब्लॅक कॅट’. त्यांना एनएसजी कमांडो, असे देखील म्हटले जाते. त्यांची वर्दी ही काळ्या रंगाची असते. तसेच ते मांजरी सारखे चपळ देखील असतात. त्यामुळे त्यांना ‘ब्लॅक कॅट’, असे बोले जाते. ‘ब्लॅक कॅट’ होण्यासाठी सैन्य, पॅरा मिलिटरी किंवा पोलिसात असणे आवश्यक असते. तसेच सैन्यातून ३ वर्षे आणि पॅरा मिलिटरीकडून ५ वर्षे कमांडो प्रशिक्षणासाठी येत असतात.


हेही वाचा – संतापजनक! ५ महिन्यांपासून तरुणीवर १७ जणांनी केला बलात्कार; ८ जणांना अटक

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -