घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यात

पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यात

Subscribe

भारतात तयार होणारी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीची लस अंतिम टप्प्यात आहे. या लसीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ नोव्हेंबर रोजी पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येत आहेत. तसेच १०० देशांचे राजदूतही येत्या ४ डिसेंबर रोजी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येणार आहेत. हे सर्व राजदूत दोन गटांमध्ये दोन्ही ठिकाणी भेट देणार असल्याची अधिकृत माहिती जिल्ह्याचे राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौर्‍यासाठी शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

कोरोनावरील लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असून, चाचणीचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. चाचणीबाबत माहिती घेण्यासाठी १०० देशांचे राजदूत येत्या ४ डिसेंबर रोजी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे. त्यांचा दौर्‍याचे नियोजन झाले आहे. मात्र त्यापूर्वी २८ नोव्हेंंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौर्‍यावर येत असून ते सीरम इन्स्टिट्यूट आणि जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देणार आहेत. राजदूतांच्या भेटीनंतर पंतप्रधान भेटीला येणे योग्य नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट २८ नोव्हेंबर रोजी सुनियोजित करण्यात आली आहे. या संदर्भातील मोदी यांचा प्राथमिक दौरा आला असून, अंतिम दौरा अद्याप आला नसल्याचे नाटेकर यांनी सांगितले. राजदूतांच्या दौर्‍याचे नियोजन ४ डिसेंबर रोजी करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी दिल्ली येथून एअर फोर्सच्या विमानाने ९८ देशांचे राजदूत लोहगाव विमानतळाच्या टेक्निकल एरिया येथे १०.१५ वाजता दाखल होणार आहेत. तर, रशिया आणि सौदी अरेबियाचे राजदूत मुंबईहून पुण्यात येणार असून, त्यांचा अंतिम दौरा अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. त्यानंतर दोन गटामध्ये हे राजदूत प्रथम सीरम आणि जिनोव्हा कंपनीला भेट देणार आहेत. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी रात्री ८.१५ वाजता पुन्हा विशेष विमानाने ते दिल्लीला रवाना होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -