Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी; पंतप्रधानांचा रोड शो सुरू तर राहुल-प्रियंकांची सभा

कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी; पंतप्रधानांचा रोड शो सुरू तर राहुल-प्रियंकांची सभा

Subscribe

बंगळुरू | कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Elections) प्रचार हा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा रोड शो सुरू झाला आहे. पंतप्रधानांचा हा रोड शो १० किलोमीटर लांबीचा आहे. या रोड शोनंतर पंतप्रधान म्हैसूर आणि शिवमोग्गा या दोन ठिकणी जाहीर सभा देखील घेणार आहेत.

दरम्यान, आज कर्नाटकात पंतप्रधानांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे देखील ४ रोड शो होणार आहेत. त्यानंतर बेलगावी येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसने देखील कर्नाटक निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसकडून माजी अध्यक्ष राहुल गांधींचा आज बंगळुरूमध्ये दोन ठिकाणी कॉर्नर सभा घेणार आहेत. तसेच राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी त्यांच्या रोड शो आणि सभा देखील होणार आहेत.

- Advertisement -

कर्नाटक निवडणुकीसाठी सोनिया गांधींनी चार वर्षानंतर पहिल्यांदाच प्रचारासाठी हजेरी लावली आहे. सोनिय गांधींनी शनिवारी बहुळी येथे रॅली घेत आणि उपस्थितांना संबोधित देखील केले. या यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सुद्धा उपस्थित होते. सोनिया गांधींनी हुबळी-धारवाड सेंट्रलमधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती. या मतदरासंघातून भाजपकडून महेश तेंगिंकाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

कर्नाटकात पहिल्य टप्प्यासाठी होणार मतदान

कर्नाटक विधानसभेत २२४ विधानसभा मतदारसंघासाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. आणि कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला ११३ आमदारांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. कर्नाटकात २२४ मतदारसंघात ५,२१,७३,५७९ मतदारांची नोंदणीकृत मतदार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५८,२८२ मतदान केंद्र उभारण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली असून १३ मे रोजी कर्नाटक विधानसभेचा निकाल लागणार आहे.

 

- Advertisment -