Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी जनणना, एसईसीसी डेटातील चुकांचा आकडा फडणवीसांनी फुगवून सांगितला, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

जनणना, एसईसीसी डेटातील चुकांचा आकडा फडणवीसांनी फुगवून सांगितला, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

फडणवीस यांनी एसईसीसी जनगणनेतील चुकांचा आकडा 'फुगवून सांगितला आणि सभागृहातील महत्वाच्या विषयावरील चर्चा भरकटवली

Related Story

- Advertisement -

राज्यातील विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतच्या ठरावासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, जनगणनेमध्ये ६९ लाख चूका असून या डेटामध्ये त्रृटी आहेत. फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याची काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलखोल केली आहे. केंद्र सरकारनेच संसदीय समिती समोर दिलेल्या माहितीनुसार ९९% एसईसीसी २०११ चा डेटा त्रुटीरहित आहे. फडणवीस यांनी चुकीची आकडेवारी सांगून जाणीवपूर्वक सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना खोटं ठरवलं आहे. चव्हाण यांनी अहवालाचा संदर्भ देत फडणवीसांनी दिशाभूल केली असल्याचे म्हटलं आहे. चव्हाण यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटलंय की, ५ जुलै २०२१ रोजी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केले की, ” २०११ साली केलेल्या एसईसीसी जनगणनेत ८ कोटी चुका असून एकट्या महाराष्ट्रात ६९ लाख चुका अहेत ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित राहण्यासाठी केंद्र सरकारने एसईसीसी डेटा राज्य सरकारला पुरवला पाहिजे असा ठराव महाराष्ट्र शासनातर्फे आणला होता. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी हे चुकीचे वक्तव्य करून जाणीवपूर्वक सभागृहाची आणि राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती आणि आकडेवारी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने संसदेतील स्टैंडिंग कमिटी समोर मांडलेल्या २७ व्या अहवालात सुस्पष्ट दिलेली आहे. २०१० साली युपीए सरकारने जात निहाय आणि आर्थिक जनगणना (एसईसीसी) करण्याचे ठरवले. त्यानुसार २९ जून २०११ रोजी काम सुरू झाले.

डेटामध्ये कोणतीही त्रुटी नाही

- Advertisement -

केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत असलेले रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि केंद्रीय शहरी आवास मंत्रालय या तीन मंत्रालयांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या जनगणनेचे काम २०१६ साली पूर्ण झाले. या अहवालातील पान क्र. १० वरील माहितीनुसार, “रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर तसेच केंद्रीय गृहमंत्रालयानुसार, एसईसीसीच्या जनगणनेतील सर्व माहितीचे विश्लेषण झाले आहे आणि ९८.८७ व्यक्तीच्या डेटामध्ये कोणतीही त्रुटी नाही.

फडणवीसांनी दिशाभूल केली

- Advertisement -

याच अहवालात पुढे नमूद केले आहे की, एसईसीसी मध्ये एकूण लोकसंख्या ११८,६४,०३,७७० एवढी नोंदवली आहे. त्यापैकी १,३४,७७,०३० एवढ्या नोंदीमध्ये काही चुका आढळल्या आहेत. संपूर्ण देशासाठी हे प्रमाण फक्त १.१३% आहे. सदर चुका दुरुस्त करण्यासाठी सीओटीएस ही प्रक्रियादेखील अनेक राज्यात राबवली गेली. या (COTS) प्रक्रियेअंतर्गत उत्तर प्रदेशातील २,०९,१८२ तर राजस्थानातील ४५,५५० चुका दुरुस्त करण्यात आल्या. दुर्देवाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसईसीसी जनगणनेतील चुकांचा आकडा ‘फुगवून सांगितला आणि सभागृहातील ओबीसी आरक्षण अशा अत्यंत महत्वाच्या विषयावरील चर्चा भरकटवली.

- Advertisement -