घरताज्या घडामोडीमहाडमधील पूरग्रस्तांचा पंचनामा अद्याप कोराच

महाडमधील पूरग्रस्तांचा पंचनामा अद्याप कोराच

Subscribe

घरांना दिली जाणारी मदत देखील बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया मंद गतीने सुरु

महाड तालुक्यात आलेल्या महापूराने हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. शासनाकडून केवळ ७.५ कोटींची मदत आली असुन या मध्ये दुकानदार आणि व्यवसायीकांना त्यांच्या दुकान नोंदणीचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घाल्याने अनेक व्यवसाईक या मदतीपासून वंचित राहणार आहेत. घरांना दिली जाणारी मदत देखील बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया मंद गतीने सुरु असल्याने पूरग्रस्तांचा पंचनामा कोराच राहतो कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संपूर्ण कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीने करोडो रुपयाची वित्तहानी झाली आहे. महाड शहरासह महाड शहर, बिरवाडी शहर, आणि लगतच्या गावांतून महापुराने थैमान घातले होते. यामुळे अनेक व्यवसायिक आणि घरांचे नुकसान झाले. शासनाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करण्यात आली आहे. सामाजिक संस्थांनी शहरात जशी जमेल त्या पद्धतीने मदत केल्याने महाडवासीय आज उभे राहू लागले आहेत. त्यातच कांही लघु व्यवसायिकांना सामाजिक आणि दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत देखील केली जात आहे. शासकीय मदतीच्या घोषणेला मात्र आता पंधरा दिवस उलटून गेले तरी शासकीय मदत पूरग्रस्तांना अद्याप मिळालेली नाही.

- Advertisement -

महाड मध्ये महसूल विभागाकडून तत्काळ पंचनामे करण्यात आले. जवळपास ९००० घरांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यांना प्रत्येकी १०,०००/- रुपयाची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी यांनी दिली आहे. मात्र दुकानदार आणि छोट्या व्यवसायीक कांना नोंदणीकृत असल्यावर नुकसान भरपाई मिळणार आहे. पुरामुळे बहुतांशी लोकांचे कागदपत्र गहाळ झाली आहेत तर अनेक छोट्या व्यवसायीक दारांची नोंदणी नसल्यामुळे ५०,०००/- च्या मदतीपासून हे व्यवसायीक वंचित राहणार आहेत. महाड तालुक्यातील ३५०० दुकानदार आणि व्यवसायीकांचे पंचनामे झाले आहेत.

महाड सह विविध गावात असलेले टपरीधारक हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मिळेल त्या जागेवर व्यवसाय उभा करतात. यातील अनेकांना पालिका अथवा ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली नसते. अशा व्यवसायिकांना या मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत शासनाने पुनर्विचार करण्याची गरज आहे.

- Advertisement -

जुलै २०२१ मधील पूर मदतीबाबत शासनाने परिपत्रक जाहीर केले असून त्यानुसार दुकानदार, टपरीधारक, अन्य व्यवसायिक यांना त्या त्या व्यवसायाच्या बाबतीतले शासकीय नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ही प्रक्रिया सुरु असून लवकरच विविध विभागाकडून खात्री करून मदत वाटप केली जाईल – प्रतिमा पुदलवाड, प्रांताधिकारी महाड

                                                                                                                 – निलेश पवार


हेही वाचा – T20 World Cup : वॉर्नर, स्मिथचे कमबॅक; टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचा मजबूत संघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -