घरक्राइमPune Crime : भर दिवसा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी

Pune Crime : भर दिवसा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी

Subscribe

मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील गुन्हेगारीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते आहे. पुणे शहरात कोयता वार, कोयता हल्ला या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशातच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे : मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील गुन्हेगारीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते आहे. पुणे शहरात कोयता वार, कोयता हल्ला या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशातच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Pune Crime A fight on Fergusson College Road in Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर दोन जणांमध्ये हाणामारी झाली. विशेष म्हमजे या हाणामारीत कोयत्यानचा वापर झाल्याने एकच खळबळ उडाली. भाडणाचे कारण शुल्लक होते. परंतू, साध्या भांडणातही कोयता वापरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

शनिवारी भर दुपारी वर्दळीचे ठिकाण असलेल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वारंवार अशा घटना घडत असून पुणे पोलिसांकडून अशा प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्ररी देखील पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये हॉटेलमधील एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली. स्वप्नील संजय शिंदे उर्फ सोप्या असे त्या व्यक्तीचे नाव असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. चार महिन्यांपूर्वी आरोपी राहुल पवार याचा लहान भाऊ रितेश पवार याची हत्या झाली होती. या हत्येतील आरोपीला स्वप्नील शिंदे यानी मदत केल्याची माहिती राहुल पवारला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे राहुलने स्वप्निलवर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. तीन आरोपींनी स्वप्नीलवर हल्ला केला. त्यापैकी अजय गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळत आहे. गुन्हेगारीसोबत ड्रग्जचा विळखाही वाढतो आहे. या वाढत्या गुन्हेगारी आणि ड्रग्जच्या विळख्याला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून पुणे पोलिसांनी तब्बल दोन हजार तीनशे किलो क्लोरल हायड्रेट पावडर (केमिकल) जप्त केले असून त्याची किंमत 60 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.


हेही वाचा – Pune Police : केमिकल ताडी तयार करणाऱ्या कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा; दोघांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -