पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख पॉझिटिव्ह; १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत पहिल्यांदाच इतक्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

corona

राज्यात कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुखांसह १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा  संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये आरोग्य, मालमत्ता आणि अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याते सांगितले जात आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची चिंता अधिक वाढली  आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

दरम्यान, पुण्यात जवळपास १०० कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली होती. यातील १२ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून यातील अनेक कर्मचारी हे आरोग्य विभागातील असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत पहिल्यांदाच इतक्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषदेतही कोरोनाचा कहर

पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यासह पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. तर स्थायी समिती आणि पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या सदस्यासह कुटुंबातील चार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयातील ६०० कर्मचाऱ्यांपैकी ५१० कर्मचारी होम क्वारंटाईन आहेत.

कोरोनाचा विळखा कायम!

दरम्यान सकाळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात गेल्या २४ तासात २०५ नवे रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधीतांचा आकडा ५६ हजाराच्या वर गेला आहे. यासह मंगळवारी १ हजार ५१२ नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. आणि एकूण ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, १ हजार ५१२ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४० हजार ७१५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ८०५ जणांना घरी सोडण्यात आले आहे.


Corona Crisis: यंदा १५ हजार Freshers ची भरती करणार ‘ही’ नामांकित…