घरताज्या घडामोडीभाजप सरकारच्या अहंकाराने शेतकर्‍यांपुढे जवानांचा बंदोबस्त

भाजप सरकारच्या अहंकाराने शेतकर्‍यांपुढे जवानांचा बंदोबस्त

Subscribe

कृषी विषयक कायदे करुन मोदी सरकारने शेतकर्‍यांना वेठीला धरले असून सरकारचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहंकाराने आता सीमेवरील जवानांनाच शेतकर्‍यांच्या विरोधात उभे ठेवले जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. हा आरोप करताना राहुल यांनी एक फोटो ट्विट केला असून, या छायाचित्रात शेतकर्‍यांचा मोर्चा अडवण्याची जबाबदारी जवानांकडे देण्यात आल्याचे स्पष्ट दिसते.

केंद्र सरकारने कृषी कायद्यात केलेल्या बदलाला देशभर अनेक ठिकाणी जोराचा विरोध होतो आहे. सरकारने शेतकर्‍यांविरोधात खोट्या केसेस दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगताना खोट्या एफआयआरमुळे शेतकर्‍यांचं धैर्य खचणार नाही हे लक्षात असू द्या, असे राहुल गांधी यांनी बजावले आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा अपराध नाही तर कर्तव्य आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राहुल यांनी ट्विट केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोत एक जवान एका म्हातार्‍या शेतकर्‍यावर लाठीचार्ज करताना दिसतो आहे. हा फोटो शेअर करत राहुल गांधींनी, आपल्या देशाचा नारा हा जय जवान आणि जय किसान असा आहे. मात्र, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारामुळे जवान शेतकर्‍यांच्या विरोधात उभे राहिले आहेत, असे म्हटले आहे.

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. संसदेत कायदे मंजूर केल्यापासून शेतकरी राज्यांमध्येच आंदोलन करत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकर्‍यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकर्‍यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आले आहे. यासाठी जवानांचा वापर करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -