घरक्राइमदुसरा खून केला म्हणून पहिल्या खुनाचा उलगडा झाला, सोशल मीडियावर ओळख...

दुसरा खून केला म्हणून पहिल्या खुनाचा उलगडा झाला, सोशल मीडियावर ओळख पटली अन् दोघांचे सूत जुळले

Subscribe

घटनाक्रम सांगितला आणि पोलिसही चक्रावून गेले.

राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ १४ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात तरुणीच्या डोक्यात दगड घालून केलेल्या निघृण खून झाला होता. त्या खुनाला चार महिन्यांनी वाचा फुटली. या घटनेतील आरोपीने पंधरा दिवसांपूर्वी आणखी एक खून केला.  त्यातच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मग राहुरीतील खुनाचा उलगडा झाला पोलीस चौकशीत आरोपीने राहुरी फॅक्टरी येथे मित्राच्या मदतीने केलेल्या खुनाची कबुली दिली. घटनाक्रम सांगितला आणि पोलिसही चक्रावून गेले. ( rahuri Yong Women Murder case)

मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड व केतन लोमटे ( दोघेही रा . शिरुर कासार , जि . बीड ) अशी आरोपींची नावे आहेत. शीतल भामरे ( रा.गाडेकर मळा नाशिक ) असे मृत तरूणीचे नाव असल्याचे समोर आले. आरोपी ज्ञानेश्वर मूळचा भातकुडगाव ( ता . शेवगांव ) येथील रहिवासी. गावात मुलींची छेड काढत असल्याने घरच्यांनी त्याला मामाकडे शिरूर कासार येथे पाठवले. त्याची सोशल मीडियातून शीतल भामरे या विवाहितेची ओळख झाली . तिला दोन मुले होती . तिचे ज्ञानेश्वर सोबत प्रेम जमल्याने सहा महिन्यांपूर्वी तिने शिरूर कासार गाठले. दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहू लागले. चारित्र्याच्या संशयावरून त्रास सुरू झाल्याने तिने परत नाशिकला सोडण्यास सांगितले. ज्ञानेश्वरने नाशिकला जातांना मित्र केतन लोमटेच्या मदतीने राहरी फॅक्टरी गुंजाळ नाक्या जवळ प्रेयसी शीतलचा डोक्यात लोमटेच्या मदतीने दगड घालून खून केला.

- Advertisement -

मागील अडीच महिन्यांपासून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके खुनाचा तपास करीत होते. परंतु तरुणीची ओळख पटत नव्हती. त्यामुळे तपास थंडावला होता. दरम्यान आरोपी ज्ञानेश्वरने एप्रिल महिन्यात पुन्हा दुसऱ्या मुलीशी लग्न केले. पत्नीला दागिने खरेदी केले. सराफ व्यावसायिक विशाल सुभाष कुलथे ( वय २५ , राहाणार शिरुर कासार ) याला दागिने घेऊन घरी बोलावले. त्याचा पंधरा दिवसांपूर्वी खून केला. मृत विशालला वडील नाहीत. वृद्ध आजोबा सुधाकर जगन्नाथ कुलथे ( वय ७० ) नातवाच्या खुनाच्या धक्काने मृत्यू पावले. विशालचा मृतदेह आरोपीने मामाच्या दुचाकीवरून भातकुडगाव ( ता. शेवगाव ) येथे स्वतःच्या शेतात नेऊन पुरला. मामाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. भीतीपोटी आरोपीचे मामा अजिनाथ गायके ( रा . शिरुर कासार ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली .

आरोपी दोन खून व दोन मृत्यूस कारणीभूत ठरला. मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याने प्रेयसी शीतल भामरे हिचा राहुरी फॅक्टरी येथे खून केल्याची कबुली दिली आहे. शिरूर कासार ( जि . बीड ) येथे विशाल कुलथे यांच्या खून प्रकरणात आरोपी पोलीस कोठडीत आहे . दोन दिवसांनी कोठडी संपल्यावर आरोपीला राहुरी फॅक्टरी येथील खून प्रकरणात अटक करण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला जाणार असुन मगच अधिक घटनेचा उलगडा होणार आहे, असे डीवायएसपी, श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मेटके यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – सराफ खून प्रकरण: संशयित आरोपी लपला होता नाशिकमध्ये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -