Raigad Premier League : क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंचा झाला लिलाव

या स्पर्धेत आठ संघांचा समावेश असेल. संपूर्ण आयपीएल स्पर्धा रायगड जिल्ह्यातील टर्फ पीच असलेल्या मैदानावर खेळवण्यात येईल.

Raigad Premier League: Cricket players auctioned
Raigad Premier League : क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंचा लीलाव संपन्न

रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या २५ वर्षा खालील खेळांडूंसाठी ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रायगड प्रीमिअर लिग कमिटी मार्फत करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होणारी ही क्रिकेट स्पर्धा रायगड जिल्ह्यातील खेळांडूना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेची बनली आहे.रायगड प्रीमिअर लिग ही नोंदणीकृत संस्था असून, स्पर्धेत खेळणार्‍या खेळाडूंचे लिलाव (ऑक्शन) पनवेल तालुक्यातील मानघर येथील छाया रिसॉर्टमध्ये उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले. आठ संघांमध्ये ही स्पर्धा होणार असून, रायगड जिल्ह्यातील सुमारे चारशे खेळाडूंनी ह्या स्पर्धेत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून आपापला सहभाग नोंदवला होता. खेळाडूंना ऑक्शन पद्धतीने आठ संघांच्या संघ मालकांनी आभासी पॉईंट्स प्रकाराने आपापल्या संघात दाखल करून घेतले आहे. लीलावातून एकेका संघात १५ खेळाडूंची निवड करण्यात आली.या स्पर्धेत आठ संघांचा समावेश असेल. संपूर्ण आयपीएल स्पर्धा रायगड जिल्ह्यातील टर्फ पीच असलेल्या मैदानावर खेळवण्यात येईल.

ज्या खेळाडूनचे लीलाव (ऑक्शन) झालेले नाही अशा खेळाडूंसाठी स्वतंत्र सामन्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. यातून चांगली कामगिरी करणार्‍या १६ खेळाडूंना आरपीएल स्पर्धेत आठ संघांमध्ये विभागून स्थान दिले जाईल. कोविड काळात खंडित झालेल्या क्रिकेट खेळाकडे आता युवा खेळाडूंचे लक्ष लागले असताना रायगड प्रीमिअर लीग सारख्या स्पर्धेमुळे त्यांच्या क्रिडागुणांना वाव मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व संघांना रायगड जिल्ह्यातील गडकिल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत.

लीलावातील संघाचे मालक

१) रायगड वॉरियर्स, संघमालक-आदित्य दर्गे, देवेंद्र चवरे, २) द्रोणागिरी मास्टरर्स, संघमालक- फ्रेंड्स क्लब, ३) सुधागड रायडर्स, संघमालक – आवेश चीचकर, ४) सह्याद्री चॅम्पियन्स, संघमालक- रतन खारोल आणि दिपक ठक्कर, ५) जंजिरा चायलेंजर्स,संघमालक- सचिन राऊळ, ६) कुलाबा स्ट्राईकर्स, संघमालक – संदेश गुंजाळ आणि अभिजित तुळपुळे, ७) खांदेरी-उंदेरी किंगस,संघमालक-कुमार बासरे, ८) उमरखिंड फायटर्स, संघमालक-अ‍ॅड.आलिम शेख, विजय खानावकर आणि प्रदिप स्पोर्ट्स.


हे ही वाचा – Video : राज ठाकरेंचाही ड्रायव्हिंग मूड, मनसैनिकांकडून सव्वा कोटींची लँड रोवर गिफ्ट