सफाळे : कानात इअरफोन घालून रेल्वे रुळावरून चालणं एका विद्यार्थीच्या जीवावर बेतलं आहे. कानात इअरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असताना ट्रेनची धडक बसली. या धडकेत विद्यार्थीनीची जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. (Railway Accident Student hit by Rajdhani Express while walking on tracks with earphones in her ears at saphale railway station)
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी रावल असे रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. सफाळे रेल्वे स्थानक परिसरात कानात इअरफोन घालून वैष्णवी रावल ही रेल्वे रुळ ओलांडत होती. मात्र ट्रेन येत असल्याचा अंदाज न आल्याने वैष्णवी रावल हिला राजधानी एक्स्प्रेसची धडक बसली. या धडकेत वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला आहे.
सफाणे स्थानकातील माकणे गावात उड्डाणपूल नसल्याने येथील रहिवाशी धोकादायक पद्धतीने रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करत असतात. याच प्रवासात अनेक विद्यार्थीही असतात. हे विद्यार्थी मोबाईल अॅडिक्ट असल्याने अनेकदा मोबाईलमध्ये दंग होऊन कानात इअरफोन घालतात आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. त्यामुळे रेल्वे ओलांडत असताना ट्रेन येत असल्याचा अंदाज त्यांना येत नाही. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.
हेही वाचा – आधी लाडक्या बहिणी अपात्र, आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार; वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल