घरक्राइमधक्कादायक! पतीने झाडं कापण्यास नकार दिल्यामुळे गर्भवती पत्नीवर मुलांसमोर केला बलात्कार

धक्कादायक! पतीने झाडं कापण्यास नकार दिल्यामुळे गर्भवती पत्नीवर मुलांसमोर केला बलात्कार

Subscribe

एका दलित व्यक्तीने झाडं कापण्यास नकार दिल्यामुळे त्याच्या गर्भवती पत्नी, दोन मुलं आणि सासूचे अपहरण केले. चार दिवस त्यांच्यावर अत्याचार केला आणि गर्भवती पत्नीवर मुलांच्या समोरच बलात्कार केल्याची धक्कादायक घडना उडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यांमध्ये ही घटना घडली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून ३५० किलोमीटर दूर असलेल्या छतरपुर जिल्ह्यात बुधवारी एका पत्रकाराने पोलिसांना माहिती दिल्यानंतर सर्वांची सुटका करण्यात आली आहे. यादरम्यानच गर्भवती महिलेने आपल्या मुलांसमोर बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी गावातलाच असून त्याला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. पण त्याच्या जवळच्या दोन आरोपीं पकडण्यापूर्वीच पळून गेले. गुरुवारी याप्रकरणातील महिलेने पत्रकाराला सांगितले की, गावातील एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून यामध्ये बलात्काराचा उल्लेख केला नाही आहे.

- Advertisement -

एफआयआरमध्ये तिन्ही आरोपींवर दुखापत, अपहरण, अश्लीलता आणि अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छतरपुरचे पोलीस अधीक्षक सचिन शर्मा म्हणाले की, ‘महिलेने केलेला खुलाशानंतर एफआयआरमध्ये बलात्काराशी संबंधित कलम जोडले जातील. महिलेच्या शरीरावर जखमा असून तक्रारीत तिने पोलिसांना फक्त शारीरिक छळ केल्याची माहिती दिली. तिने कोणत्याही लैंगिक अत्याचाराबद्दल आम्हाला सांगितले नाही. परंतु ती जर सांगत असेल तर आम्ही एफआयआरमध्ये बलात्कारसंबंधित कलम समाविष्ट करू.’

नक्की काय घडले?

राजनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी पंकज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय एका दलित मजुराला आपल्या शेतातील झाडं कापण्यासाठी बोलावले होते. परंतु त्याची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्याने नकार दिला. त्यामुळे त्याला शिक्षा म्हणून मारहाण केली. तेथून तो कसाबसा पळून गेला. त्यानंतर आरोपी मजुराच्या घरी गेले आणि गर्भवती पत्नी, दोन मुलं आणि आईला मारहाण केली. त्यांचे अपहरण केले आणि चार दिवस त्यांचा छळ केला. एका स्थानिक पत्रकाराने या प्रकरणाबाबत ऐकले आणि पोलिसांना माहिती दिली. मग बुधवारी पोलिसांनी त्यांना वाचवले. स्थानिक रुग्णालयात दाखल केले, त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दगळी चाळीत दररोज नव्या खोलीत झोपणारा डॅडी, अखेर पोलिसांना सापडला सोफ्यात


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -