घरताज्या घडामोडीभारत-चीनमधील चकमकीचा मुद्दा संसदेत गाजणार, विरोधक आक्रमक

भारत-चीनमधील चकमकीचा मुद्दा संसदेत गाजणार, विरोधक आक्रमक

Subscribe

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचे प्रकरण जोर धरत आहे. अशातच आज चीन आणि भारताच्या सैनिकांमधील या चकमकीचा मुद्दा विरोधक संसद अधिवेशनात काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचे प्रकरण जोर धरत आहे. अशातच आज चीन आणि भारताच्या सैनिकांमधील या चकमकीचा मुद्दा विरोधक संसद अधिवेशनात काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, हा मुद्दा उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. काँग्रेस आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी याप्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहे. विशेष म्हणजे भारत-चीनमधील चकमकीच्या मुद्द्यावर ओवेसी स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. चिनी सैनिक तवांगच्या याग्त्से भागात भारतीय लष्कराची चौकी हटवू इच्छित होते. परंतु, भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देऊन ते परतवून लावले.

- Advertisement -

हिंसक संघर्षावरून काँग्रेसनेही सरकारला घेरले आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे प्रकरण समोर आल्याचे काँग्रेसने म्हटले. तसेच, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही ट्विट करत मोदी सरकारचा समाचार घेतला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘आम्हाला भारतीय लष्कराच्या शौर्याचा अभिमान आहे. सीमेवर चीनची कृती कोणत्याही प्रकारे मान्य केली जाणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून आपण वारंवार सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र मोदी सरकार आपली राजकीय प्रतिमा वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच चीनचा उद्धटपणा वाढत आहे.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीबाबत जोरदार टीका केली आहे. सरकारला घेरताना ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेशातून येणाऱ्या बातम्या चिंताजनक आहेत. भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये मोठी चकमक झाली आणि सरकारने अनेक दिवस देशाला अंधारात ठेवले. संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे का सांगण्यात आले नाही? घटनेचा तपशील अपूर्ण आहे.

- Advertisement -

ओवेसी म्हणाले, सरकारने संसदेला माहिती द्यायला हवी होती. भारतीय लष्करावर आमचा पूर्ण विश्वास आहे. गलवनच्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ना कोणी प्रवेश केला आणि ना कोणी प्रवेश करणार. ते अजूनही तेच म्हणत आहेत का? योग्य उत्तर का दिले जात नाही? संसदेत सरकारकडून उत्तरे मागण्याची गरज असल्याचे सांगत ओवेसी पुढे म्हणाले की, सरकार या प्रश्नापासून पळ काढणार नाही. आमचे सैनिक जखमी असूनही व्यापारातील असमतोल चीनच्या बाजूने आहे. आम्हाला संसदेत सरकारकडून उत्तर हवे आहे आणि स्थगन प्रस्ताव आणला जाईल. सरकार या प्रश्नापासून पळ काढणार नाही, अशी आशा आहे.

आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, ‘लष्कर चीनला कधीही चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील कमकुवत राजकीय नेतृत्वामुळे चीनचा हा अपमान झाला आहे. संसदेत यावर तातडीने चर्चा होण्याची गरज आहे. मी उद्या या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडणार आहे.

“आमच्या सैन्यातील जवान देशाची शान आहेत. मी त्याच्या शौर्याला सलाम करतो. तसेच, त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो”, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जवानांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली

“आमच्या भारतीय सैन्याच्या सैनिकांना पुन्हा चिनी लोकांनी भडकावले आहे. आमचे जवान शौर्याने लढले आणि त्यातील काही जखमीही झाले. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आम्ही देशासोबत आहोत आणि त्यावर राजकारण करायला आवडणार नाही. मोदी सरकारने एप्रिल 2020 पासून एलएसीवरील सर्व ठिकाणी चिनी अतिक्रमण आणि बांधकामाबाबत प्रामाणिक असले पाहिजे. सरकारने या विषयावर संसदेत चर्चा करून देशाला विश्वासात घेण्याची गरज आहे. आपल्या सैनिकांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे आपण सदैव ऋणी राहू”, असे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ट्विट करून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.


हेही वाचा – पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सतर्क; आंतरराष्ट्रीयसह भारतीय भाषांमध्ये हेल्पलाइनची सुविधा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -