घरताज्या घडामोडीरायगडमध्ये आर्थिक फसवणुकीचा वाढता आकडा 

रायगडमध्ये आर्थिक फसवणुकीचा वाढता आकडा 

Subscribe

४१ कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक

देशात आणि महाराष्ट्रातील आर्थिक फसवणुकीच्या तुलनेत रायगड जिल्ह्यातही अशी फसवणूक करण्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. गेल्या ५ वर्षांच्या काळात ६१२ आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून, या गुन्ह्यांमध्ये ४१ कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यातील अनेक गुन्हे  गुंतागुंतीचे असल्याने त्यांच्या तपासासाठी पोलिसांना मर्यादा येत आहे.आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखा सुरू करण्यात आली आहे. मोठ्या रक्कमेच्या फसवणुकीचे गुन्हे या शाखेकडे दिले जातात.

जसजसा काळ बदलत गेला गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत देखील बदलत गेली. रायगड जिल्ह्यामध्ये आर्थिक फसवणुकीचा आकडा वाढता आहे. त्यातून ५० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात रायगड पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले असून, पोलिसांनी अनेक ठगांना गजाआड करण्यात आले आहे. मात्र नागरिक सतर्क नसल्याने फसवणुकीच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. यामुळेच ऑक्टोबरअखेर ४१ कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाल्याच्या नोंदी निर्माण झाल्या आहेत.

- Advertisement -

एक कोटींपासून ते पाच कोटी रुपयांपर्यंतच्या फसवणुकीचे हे गुन्हे आहे. बनावट चेक देऊन फसवणूक, ठेवीदारांचे फसवणूक, बोगस कर्जप्रकरण, चिटफंडातून पैसे गोळा करणे असे हे फसवणुकीचे गुन्हे आहेत. हल्ली रोखीपेक्षा धनादेश, आरटीजीएस, ऑनलाईन असेच व्यवहार होत असल्याने याचा गुन्हेगार आपसूक फायदा उठवतात. हीच संधी साधत काहीजण सोने स्वस्तात देतो, तुम्ही लकी ठरले आहात, मोठे गिफ्ट देतो, जास्त पैसे गुंतवल्यास दामदुप्पट रक्कम मिळेल अशा भूलथापा देऊन अनेकांची फसवणूक करीत असतात. लोभ व घाईमुळे  अमिषाला बळी पडून अनेकजण स्वतःची आर्थिक फसवणूक करून घेतात आणि नंतर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते.  रायगड जिल्ह्यात वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच बेरोजगारीमुळे झटपट पैसा मिळविण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे.

रायगड जिल्ह्यात मागील ५ वर्षात आर्थिक फसवणुकीचे ६१२ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३८६ गुन्ह्यांची उकल रायगड आर्थिक गुन्हे शाखेने केली असून अनेक गुन्हेगारांना गजाआड केले आहे. ऑक्टोबर २०२१ च्या शेवटी ४१ कोटी ३१ लाख ७६ हजार ८४ फसवणूक झाल्याचे दाखल गुन्ह्यांतून स्पष्ट झाले. यापैकी २ कोटी २७ लाख २३ हजार ६१७ रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -

बँकिंग फसवणूक, जमीन फसवणूक, वेगवेगळ्या स्कीमचे आमिष लोकांना दाखवले जाते, दामदुप्पट योजना अशी प्रलोभने दाखवून लोकांची फसवणूक केली जाते. जिथे आपण गुंतवणूक करतो, त्या संस्थेला रिझर्व्ह बँकेची मान्यता आहे किंवा कसे याची माहिती घेताना आपल्या खात्याचा तपशील उघड न करण्याची खबरदारी घेतली तर फसवणूक होणार नाही.

अनिल लाड, पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा रायगड

 

वर्ष                         दाखल गुन्हे          उघड गुन्हे

२०१७                         ११२                    ६४

२०१८                         ११३                    ७७

२०१९                         १३६                    ८५

२०२०                         १२७                     ७८

२०२१ ऑक्टो                 १२४                     ८२


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -