घरताज्या घडामोडीHeroin seized: नवी मुंबईतल्या न्हावा शेवा बंदरातून १२५ कोटींचे हेरोईन जप्त

Heroin seized: नवी मुंबईतल्या न्हावा शेवा बंदरातून १२५ कोटींचे हेरोईन जप्त

Subscribe

या प्रकरणात जयेश संघवी नावाच्या व्यापाऱ्याला अटक केली आहे.

मुंबईत सध्या एकीकडे ड्रग्ज संदर्भात छापेमारी सुरू आहे तर दुसरीकडे नवी मुंबईतल्या न्हावा शेवा बंदरातून (Nhava Sheva port ) २५ किलो हेरोईन जप्त करण्यात आले आहे. (Rs 125 crore Heroin seized worthfrom Nhava Sheva port in Navi Mumbai)  महसूल गुप्तचर संचालनालयाकडून DRI (Directorate of Revenue Intelligence) कंटेनरमधून १२५ कोटींचे हेरोईन जप्त करण्यात आले आहे. मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाकडून नाव्हा शेवा येथे धाड टाकण्यात आली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात जयेश संघवी नावाच्या व्यापाऱ्याला अटक केली आहे.

- Advertisement -

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या जयेश संघवी या व्यापारी ६२ वर्षांचा असून त्याच्यावर आधीपासून इराणच्या शेंगदाण्याच्या तेलाच्या मालामध्ये २५ किलो हेरोइनची तस्करी केल्याचा आरोप आहे. DRI (Directorate of Revenue Intelligence) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाव्हा शेवा येथे कंटेनरमध्ये सापडलेले हेरोईन हे इराणमधून आणण्यात आले होते. ४ ऑक्टोबरपासून अधिकारी त्याचा शोध घेत होते.

मागील महिन्यातही मुंबई विमानतळावर दोन महिलांनाकडून ५ किलो हेरोइन जप्त करुन सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी महिलांना अटक केली होती. ५ किलोचे हिरोईन सुमारे २५ करोड रुपांयाचे होते.

- Advertisement -

DRI ने दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर वैभव एंटरप्राइजेसच्या संदीप ठक्करने इम्पोर्ट केला होता. मस्जिद बंदर येते त्याचे ऑफिस आहे. DRI च्या टीमने त्याची चौकशी केली असता,ठक्करने सांघवीला त्याच्या फर्मच्या IECमधून इराणचे सामान इम्पोर्ट करण्यासाठी १० हजार रुपयांची ऑफर दिली होती. जवळपास १५ वर्ष तो सांघवी सोबत व्यवहार करत होता.

DRI ने सांघवीला अटक केली असून त्याच्याविरोधात नार्कोटिक ड्रग्ज आणि साइकोट्रोपिक सब्सटेंस कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी त्याला मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केले जाणार आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत त्याला DRI कोठडी सुनावण्यात आली आहे. सांघवीला ताब्यात घेतल्यानंतर DRIची टीम आज सकाळापासून मुंबई पोर्ट येथील दुसऱ्या कंटेनरचा देखील शोध घेत आहे.


हेही वाचा – Cruise Drugs Case: ड्रग्ज प्रकरणी नायजेरियन नागरिकाला अंधेरीतून अटक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -