Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी safe Diwali 2021 : कोविड काळात सुरक्षित दिवाळी कशी साजरी कराल ?...

safe Diwali 2021 : कोविड काळात सुरक्षित दिवाळी कशी साजरी कराल ? ; लक्षात ठेवा ‘या’ चार गोष्टी

Subscribe

दिवाळीनिमित्त नागरिकांमध्ये तुफान गर्दी

दिवाळी म्हणजे घराघरात आकाशकंदील, दिवाळीच्या पदार्थांची रेलचेल, पाहुण्यांची वर्दळ अशा अनेक गोष्टींची लगबग दिवाळीनिमित्त सुरु असते. यावर्षी दिवाळी ही वसुबारस (vasubaras) आणि धनत्रयोदशी (dhantrayodashi) या सणाच्या मुहूर्तावर सोमवारी १ नोव्हेंबरपासून देशभरात दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. ह्यावेळेस लक्ष्मीपूजन (Lakshmipujan) ४ नोव्हेंबरला आहे. यानिमित्ताने सर्वच बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी पाहता राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील कोविडमुळे लादण्यात आलेले निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र कोरोना पूर्णच नाहीसा झाला आहे की काय ? या अविर्भावात नागरिक वागत असून, खरेदी विक्रीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत, सुरक्षित दिवाळी साजरी करण्यासाठी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यातून कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या बातम्या येत आहेत. सुरक्षित दिवाळीसाठी कोरोनापासून विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत. लक्षात ठेवा की कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. यासाठी दिवाळीची धामधूम नेहमीप्रमाणे असली तरी या कोविडच्या काळात ही दिवाळी सुरक्षितरित्या साजरी करणे आवश्यक आहे. यासाठी खालील चार गोष्टी लक्षात ठेवा..

१. सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक

दिवाळीत बाजारपेठांमध्ये गर्दी वाढते, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळल्यास कोरोनापासून सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांनी दिवाळीची खरेदी किंवा गेट टू गेदर करताना सोशल डिस्टन्सिंगची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला आरोग्य तज्ञ सतत सल्ला देत आहेत.

२. मास्क लावणे अनिवार्य

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, खबरदारीच्या उपायांमध्ये मास्क लावणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे तुम्हाला कोरोनापासून तर सुरक्षित ठेवेलच, पण फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासूनही वाचवेल.

३. आपले हात स्वच्छ ठेवा

कोरोनापासून बचाव करण्यासाठी हाताच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: बाजारात वस्तू खरेदी केल्यानंतर अन्न खाणे, लोकांना भेटणे, हस्तांदोलन करणे इ. अशा परिस्थितीत अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरने हात पूर्णपणे स्वच्छ करा. हे लक्षात ठेवा की सॅनिटायझर ज्वलनशील आहे, त्यामुळे दिवे आणि आगीभोवती अजिबात वापरू नका.

४. लसीकरण आवश्यक

- Advertisement -

दिवाळीत गर्दी वाढते, त्यामुळे लस घेणे गरजेचेच आहे. मात्र यानंतरही तुम्ही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे आवश्यक आहे.


हे ही वाचा – ayodhya deepotsav 2021 : १२ लाख दिव्यांनी उजळून निघणार ‘अयोध्यानगरी’, गिनीज बुकमध्ये होणार नोंद


 

- Advertisment -