जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२१ -२२ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ.करिता महामंडळाकडून सरासरी ६० टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ०३ ते ०५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला,गुणपत्रिका, २ फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतीत आपले पूर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था (मर्या) सदनिका क्र.०२ तळमजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे, रायगड अलिबाग, मो.नं.8976959795/8767682731 या पत्त्यावर दि. १५ ऑगस्ट, २०२१ पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), रायगड-अलिबाग श्री.अंगद लिंबाजी कांबळे यांनी केले आहे.
हेही वाचा – सावधान ! पुण्यात ‘वास्तूशोध’ करताय, परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली कुलकर्णीकडून कोट्यवधींची फसवणूक