घरठाणेनृत्य गायन आणि सरोद वादनाने रसिक मंत्रमुग्ध

नृत्य गायन आणि सरोद वादनाने रसिक मंत्रमुग्ध

Subscribe

संगीतभूषण पं राम मराठे महोत्सव

ठाणे : नृत्य, गायन, वादन आदी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या कला सादरीकरणाने पं.राम मराठे संगीत महोत्सवाचे दुसरे पुष्प शनिवारी राम गणेश गडकरी रंगायतन येथे गुंफले. प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना विधा लाल, नवी दिल्ली यांच्या कथ्थक सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारित सादर केलेले कथ्थक नृत्य रसिकांची विशेष दाद मिळवून गेले.

सायंकाळच्या सत्रात ठुमरी-दादरा-भजन यांचा समावेश असलेली उपशास्त्रीय संगीत मैफल शोभा चौधरी, अपर्णा केळकर, अविराज तायडे यांनी सादर केली. शोभा चौधरी यांनी ठुमरी, तसेच कहेनवा मानो राधाराणी, कजरी, अरे रामा लागो फागुन आदी शास्त्रीय गायनातील रचना सादर केल्या, तर अपर्णा केळकर यांनी हे सुरांनो चंद्र व्हा, विष्णुमय जग या रचनांसह राग सादर केले. तर अविराज तायडे यांनी सादर केलेल्या राम रंगी रंगले, इंद्रायणी काठी या रचनांने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

- Advertisement -

हिंदुस्तानी शास्त्रीय वाद्य संगीतातले एक प्रमुख तंतुवाद्य सरोद. कोलकत्याचे पं तेजेंद्र मुजुमदार यांच्या सरोद वादनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त प्रशांत रोडे यांच्यासह माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -