‘सर्वात मोठे भ्रष्टाचारी तेच, ते काय भ्रष्टाचार संपवणार’; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल

किरीट सोमय्या हे स्वत:ला महात्मा समजतात. मीच भ्रष्टाचार संपवणार, त्यांची एक घोषणा आहे, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार, सर्वात मोठे भ्रष्टाचारी तेच आहेत. ते काय भ्रष्टाचार संपवणार'', अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला.

sanjay raut said Mahavikas Aghadi will fight all the upcoming elections together
लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक लागत नाहीत; राऊतांचा राजे ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

“किरीट सोमय्या हे स्वत:ला महात्मा समजतात. मीच भ्रष्टाचार संपवणार, त्यांची एक घोषणा आहे, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार, सर्वात मोठे भ्रष्टाचारी तेच आहेत. ते काय भ्रष्टाचार संपवणार”, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला. तसंच, किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो-करोडो रुपयांची देणगी देण्यात आल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

“किरीट सोमय्या हे स्वत:ला महात्मा समजतात. मीच भ्रष्टाचार संपवणार, त्यांची एक घोषणा आहे, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार, सर्वात मोठे भ्रष्टाचारी तेच आहेत. ते काय भ्रष्टाचार संपवणार. भ्रष्टाचाराची सुरूवात महाराष्ट्रात या लोकांनी केली आणि हेच मोठ्या भाजपच्या नेत्यांसोबत भ्रष्टाचाराबाबत चर्चा की भ्रष्टाचाराविरोधात लढू.”, असं संजय राऊय यांनी म्हटलं.

“मी गेल्या दोन दिवसात त्यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेच्या खात्यात जे पैसे येत आहेत, त्यामध्ये १५० पेक्षा अधिक कंपन्या आहेत, बिल्डर्स आहेत. अनेक संशयास्पद लोक आहेत, ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची चौकशी सुरू आहे, छापे टाकले जात आहेत. या सर्वांनी किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो-करोडो रुपयांची देणगी दिली आहे.” असंही संजय राऊत यानी म्हटलं.

“तुम्ही तर भ्रष्टाचाराविरोधात लढत आहात, तुम्हाला का पैसे पाठवले आहेत. जर कोणाची काही माहिती पुढे आली तर तुम्ही ईडीला पत्र लिहिता. पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआय़ची चौकशी सुरूये, हे भ्रष्टाचाराचं मोठं प्रकरण आहे. त्यांच्याकडून किरीट सोमय्यांना लाखो रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. संशयास्पद व्यवहार झालाय, घृणास्पद व्यवहार आहे. जर ईडीमध्ये हिम्मत असेल, एनआयएमध्ये हिम्मत असेल तर किरीट सोमय्या आणि या लोकांचा काय संबंध आहे, याची चौकशी झाली पाहिजे”, असंही यावेळी राऊत म्हणाले

“किरीट सोमय्या वारंवार म्हणतात कागद दाखवा, हे घ्या. प्रतिष्ठा काय फक्त तुमच्या पत्नी आणि मुलांची आहे, आमची नाही. प्रतिष्ठा सर्वांना आहे. किरीट सोमय्यांचा मुखवटा पूर्णपणे उतरला आहे. या देशात सर्वात मोठा भ्रष्टाचारी जर कोणी असेल तर ते किरीट सोमय्या आहेत. हे मुखवटा घालून भ्रष्टाचार करतात. मोठ-मोठे उद्योगपती, सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करतात. धमक्या देतात. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराविरोधात चर्चा करतात. यामध्ये फडणवीसांची प्रतिष्ठा संपतेय. याप्रकरणी मुंबई पोलीस, चॅरिटी कमिशनर यांच्याकडे तक्रार करणार, तसेच ईडीने सुमोटो कारवाई करावी”, अशी मागणी संजय राऊतांनी केली.


हेही वाचा – राज ठाकरेंनी स्वप्नात रामाचे दर्शन करावे, प्रत्यक्षात … – बृजभूषण सिंह