घरताज्या घडामोडीSankashti Chaturthi 2021 : 2021 मधील अखेरची संकष्टी चतुर्थी आहे 'या' दिवशी...

Sankashti Chaturthi 2021 : 2021 मधील अखेरची संकष्टी चतुर्थी आहे ‘या’ दिवशी ? जाणून घ्या,तिथी आणि पूजा मुहूर्त

Subscribe

यंदाच्या वर्षातील अखेरचा महिना डिसेंबर सुरु आहे.यावर्षीची अखेरची संकष्टी चतुर्थी याच महिन्यात येणार आहे. संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. यादिवशी गणेशाचे पूजन केले जाते. चतुर्थीची पूजा दुपारी केली जाते आणि रात्री चंद्राची पूजा केली जाते. यंदाच्या वर्षातील अखेरची संकष्टी पूजा केव्हा आहे आणि पूजेची वेळ काय आहे ते जाणून घ्या. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २२ डिसेंबरला दुपारी ४:५२ वाजता सुरू होत आहे.या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी २३ डिसेंबरला संध्याकाळी ०६:२७ वाजता होणार आहे.

इंद्रयोगातील चतुर्थी

२०२१ या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी ही इंद्र योगातील आहे. या दिवशी दुपारी १२.०४ पर्यंत इंद्र योग असणार आहे. या दिवसाच्या शुभ मुहूर्तामध्ये विजय मुहूर्त दुपारी ०२:०३ ते ०२:४४ पर्यंत आहे. या दिवसांमध्ये राहूकाळ दुपारी १२:३० ते ०१ :३७ पर्यंत असणार आहे.

- Advertisement -

चंद्रोदयाची वेळ

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ०८:१२ आहे. चंद्रास्तची वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४० वाजता आहे. संकष्टी चतुर्थीला चंद्राची पूजा केली जाते आणि विनायक चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई आहे.संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या पूजेने मनोकामना पूर्ण होतात आणि संकटे दूर होतात.


 हे ही वाचा – ‘त्या कवीचे विचार ऐकून आपण गुन्हेगार आहोत असं वाटतं’, शरद पवारांकडून आठवणींना उजाळा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -