Homeताज्या घडामोडीSantosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा; खटल्यात दोन वकील...

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा; खटल्यात दोन वकील आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी

Subscribe

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. मात्र हत्येचा मास्टरमाईंड म्हटला जाणारा वाल्मिक कराड याला मकोका कारवाईपासून दूर ठेवण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्येला 34 दिवस झाले तरी एक आरोपी अजून फरार आहे. एसआयटी आणि सीआयडीकडून तपासासंबंधीची माहिती दिली जात नाही. हत्येच्या तपासात अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. हत्येचा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम किंवा सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात चालवावा, या मागण्या 14 जानेवारीपर्यंत मान्य झाल्या नाही तर संतोष देशमुख यांची पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आणि भावजय हे सामूहिक आत्महत्या करणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

काय आहे निवेदनात?

मस्साजोग गावातील महादेव मंदिरात बैठक झाली आणि त्यानंतर तहसीलदारांना निवदेन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेला 34 दिवस झालेआहेत. तरीही एक आरोपी अजून फरार आहे, त्याला अटक झालेला नाही. हत्येचा मास्टरमाईंड म्हटला जाणारा वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा जाणीव पूर्वक नोंद केलेला नाही. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच सीआयडीचा तपास कुठ पर्यंत आलेला आहे. याची माहीती कुटुंबीयांना दिली जात नाही. तसेच सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम किंवा ॲड. सतीश मानेशिंदे यांची अद्याप नेमणुक झालेली नाही. एसआयटी समीती मध्ये अ‌द्याप अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला जर जामीन भेटला तर त्याच्या हातुन हाल-हाल होऊन मरण्यापेक्षा आम्ही कै. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय व सर्व गावकरी हे 14 जानेवारी रोजी महादेव मंदीर या ठिकाणी अंगावर पेट्रोल ओतुन जाळुन घेऊन सामुहीक आत्मदहन करणार आहेत, असे संबंधित निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा : CM Fadnavis : खाते उपमुख्यमंत्री शिंदेंचे, नियोजन मुख्यमंत्री फडणवीसांचे; वाचा सविस्तर…