घर क्राइम बायको पळून गेली म्हणून ठेवायचा इतर महिलांशी संबंध आणि नंतर...

बायको पळून गेली म्हणून ठेवायचा इतर महिलांशी संबंध आणि नंतर…

Subscribe

बायको पळून गेल्याचा राग मानत ठेऊन ही व्यक्ती इतर महिलांशी शारिरीक संबंध ठेवत असल्याचे उघडकीस आले आहे.

सध्या ‘देवमाणूस’ ही मालिका चांगलीच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. ही मालिका एका सत्य घटनेवर आधारित असून अशीच एक घटना तेलंगणातील हैदराबादमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सिरीयल किलरला अटकही केली आहे. बायको एका पुरुषासोबत पळून गेल्याच्या रागाने हा आरोपी इतर महिलांशी शारिरीक संबंध ठेवायचा. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असता एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमके काय घडले?

आरोपी रामुलू याचे वयाच्या २१ व्या वर्षी लग्न झाले होते. मात्र, त्याची पत्नी एका पुरुषासोबत पळून गेली. आपली पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेल्याची चीड आणि राग त्याच्या मनात होता. त्यानंतर त्यांनी २००३ पासून सर्वच महिलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली होती. तो अनेक महिलांशी शारिरीक संबंध ठेवायचा आणि त्यानंतर त्यांची हत्या करायचा. आतापर्यंत त्यांनी तब्बल १८ महिल्यांशी शारिरीक संबंध ठेऊन त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अशी आली घटना उघडकीस

- Advertisement -

आरोपी रामुलू यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी घाटकेसर येथील अंकुशपुरमध्ये वेंकटगिरी येथील एका ५० वर्षीय महिलेशी शारिरीक संबंध ठेवले. नंतर त्यांनी त्या महिलेची हत्या केली. हत्येचा तपास करताना आरोपी रामुलू यांने ही हत्या केल्याचे उघडकीस झाले. त्यानंतर आरोपी रामुलू याची चौकशी केली असता त्यांनी ही पहिलीच हत्या केली नसून यापूर्वीही तब्बल १८ महिलांशी शारिरीक संबंध ठेऊन त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

आरोपीची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ‘माझी पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेल्यामुळे माझ्या मनात महिलांविषयी चीड होती. त्यामुळे मी महिलांना पैसे देऊन त्यांच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करायचो आणि नंतर त्यांची हत्या करत असे’.


- Advertisement -

हेही वाचा – अंधेरी येथे तरुणीच्या विनयभंगप्रकरणी भाजी विक्रेत्याला अटक


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -