घरताज्या घडामोडीसिडकोकडून सेवा हस्तांतरण ; आयुक्तांनी घेतली विभाग प्रमुखांची बैठक

सिडकोकडून सेवा हस्तांतरण ; आयुक्तांनी घेतली विभाग प्रमुखांची बैठक

Subscribe

बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम राबविण्याचे निर्देश सर्व प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात आले.

सिडकोकडून विविध सेवा महापालिकेला हस्तांतरीत करण्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख यांनी उपायुक्त आणि संबधित विभाग अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके आणि सचिन पवार, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव आणि वंदना गुळवे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, शहर अभियंता संजय जगताप, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, अग्निशमन विभागप्रमुख अनिल जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

सध्या सिडको विभागातील घनकचर्‍याची सेवा महापालिका पुरवित असून, येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारे या सेवा देखील पालिका आपल्याकडे घेणार आहे. याबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. सिडकोकडून सेवा हस्तांतरित केल्यानंतर देखभालीचा अंदाजित खर्च, लागणारे मनुष्यबळ, प्रत्येक नोडमध्ये सिडकोने पूर्ण केलेली कामे, तसेच अपूर्ण कामे यांचा सविस्तर आढावा घेऊन या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबधित अधिकार्‍यांना दिल्या.

- Advertisement -

प्रशासकीय मुख्यालय इमारत बांधणीच्या कामाला वेग देण्याच्या दृष्टीने बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या. याच बरोबर महापौर बंगल्याचे अंदाजपत्रक तयार करणे, प्रभाग समिती कार्यालय बांधणे, पाण्याच्या टाक्या बांधणे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे, माता-बाल संगोपन केंद्र आदींचे प्रस्ताव तयार करण्याच्याही सूचना देशमुख यांनी दिल्या. अन्य कामांबद्दलही त्यांनी त्या-त्या विभागाच्या प्रमुखांना प्रस्तावाबाबत सूचित केले. तसेच बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम राबविण्याचे निर्देश सर्व प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात आले.


हेही वाचा – दिवा-ठाणे रेल्वेमार्गावर मोठा अपघात टळला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -