Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम बाळाच्या हव्यासापोटी सात वर्षाच्या मुलीचं यकृत कापले

बाळाच्या हव्यासापोटी सात वर्षाच्या मुलीचं यकृत कापले

बाळासाठी एका सात वर्षाच्या मुलीचे यकृत काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशात मन हेलावणारी घटना घडली आहे. एका सात वर्षाच्या मुलीचे यकृत काढल्याची धक्कादायक घटना समोर आली असून मुलाच्या हव्यासापोटी गावातील एका दांपत्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी त्यांनी मुलीच्या शेजारी राहणाऱ्या दोघांना एक हजार रुपये दिले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशात एका सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला असून या मुलीचे यकृत बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीवर बलात्कार झाल्याचाही संशय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शनिवारी रात्री दोघांनी मुलीचे अपहरण केले. दारुच्या नशेत असणाऱ्या दोघांनीही मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर त्यांनी यकृत बाहेर काढले आणि विधी करण्यासाठी दांपत्याकडे सोपवले, असेही पोलिसांनी सांगितले आहे. रविवारी सकाळी मुलीचा मृतदेह गावात सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शरिरातील इतर अवयवही बाहेर काढण्यात आले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी संशयाच्या आधारे मुलीचे शेजारी अंकुल आणि बीरन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ‘अंकुरचे काका परशुराम यांनी आम्हाला पैसे दिले होते’, अशी माहिती त्यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, ‘दोन्ही आरोपींनी मुलीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिचे यकृत बाहेर काढले आणि परशुराम यांच्याकडे नेऊन सोपवलं’. परशुरामचं १९९९ मध्ये लग्न झाले असून मूल नसल्याने त्याला नैराश्य आले होते, असे पोलिसांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय पीडितेच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – अपह्रत महिलेवर १८ दिवस सामुहिक बलात्कार; शहरात खळबळ!


- Advertisement -