Breaking: मुंबईत कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू, एकूण संख्या ७

mumbai police
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईत कोरोनामुळे आज आणखी एका पोलिसाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई पोलीस मोटार ट्रान्सपोर्ट विभाग नागपाडा येथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा आज कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या सातवर पोहोचली आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात नाशिक, सोलापूर आणि पुणे मिळून तीन पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात एकूण आकडा आता दहावर पोहोचला आहे.

मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. मृत पोलीस हाय रिस्क एज-ग्रुपमध्ये असल्यामुळे १५ दिवसांपासून रजेवर असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. कोरोनाचे समूहात संक्रमण रोखण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्तासारखी धोकादायक ड्युटी केली जात आहे. आपले कर्तव्य पार पाडत असताना पोलिसांना देखील या व्हायरसचा संसर्ग झाला असून हे कोविड योद्धे मृत्यूमुखी पडत आहेत.