घरक्राइमCruise Drug bust : वकील बदलण्यासाठी किंग खानला भाईजानचा सल्ला ? कोण...

Cruise Drug bust : वकील बदलण्यासाठी किंग खानला भाईजानचा सल्ला ? कोण आहेत जेष्ठ वकील अमित देसाई

Subscribe

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणातील जामीन अर्जावर आज बुधवारी सत्र न्यायालयात सुनावणी आहे. फक्त सुनावणीला काही तास शिल्लक असतानाच आर्यन खानचे वकील बदलण्याचा निर्णय किंग खानने घेतला. त्यामुळेच आता जेष्ठ वकील सतीश मानेशिंदें एवजी जेष्ठ वकील अमित देसाई आर्यन खान जामीन प्रकरणात बाजू मांडणार आहेत. बॉलिवुडचा भाईजान सलमान खानचे आणि अमित देसाईंचे एक कनेक्शन आहे. आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यानंतर किंग खानच्या घरी आलेली पहिली व्यक्ती म्हणजे सलमान खान होती. त्यामुळेच सलमानच्या सल्ल्यावरून तर किंग खानने वकील बदलला नाही ना ? या तर्कवितर्कांना आधा उधाण आले आहे. (Shahrukh changed lawyer for aryan bail petition, who is amit desai ?)

सतीश देसाईंचे सलमान कनेक्शन

बॉलिवुडचा भाईजान म्हणजे सलमान खानला २००२ च्या हिट एण्ड रन प्रकरणात न्याय मिळवून देण्यात अमित देसाईंची भूमिका खूपच मोलाची ठरली होती. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. पण या शिक्षेला आव्हान देत अमित देसाईंनी सलमानला यशस्वीपणे जामीन मिळवून दिला. २०१५ साली या प्रकरणी सलमानला ३० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला होता. तपास यंत्रणांना पुरावे सादर करण्यात आलेल्या अपयशामुळेच या प्रकरणात १० डिसेंबर २०१५ रोजी सलमान निर्दोष सुटला. त्यामुळेच सलमानच्या मदतीला धावणाऱ्या अमित देसाई यांच्या मदतीचा सल्ला कदाचित सलमान खानने शाहरूखला दिला असावा अशी चर्चा आहे. आर्यनचा एन सुनावणी आधीच वकील बदलल्याने आता अमित देसाईंच्या आजच्या युक्तीवादाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

काय असू शकतो युक्तीवाद ?

आर्यन खानकडे या प्रकरणात एनसीबीला काहीही सापडले नाही. फक्त चॅटच्या आधारावर एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. आम्ही न्यायालयासोबत आहोत, असा युक्तीवाद अमित देसाईंकडून होऊ शकतो. सतीश मानेशिंदे यांनी याआधीच आर्यनचा जामीनअर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी आज सत्र न्यायालयात सुनावणी होणे अपेक्षित आहे. याआधीच्या सुनावणीच्या वेळी एनसीबीचे वकील अद्वैत सेठ यांनी जामीन अर्जाला उत्तर देण्यासाठी वेळ मागिता होता. तयामुळे या जामीन अर्जावर आता एनसीबीचे आज म्हणणे मांडले जाणे अपेक्षित आहे. आर्यन खान सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. आर्यनचा सध्याचा मुक्का हा आर्थर रोड जेलमध्ये आहे. या प्रकरणात आर्यनसह आणखी ७ जणांना अटक केली आहे. त्यांच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी अपेक्षित आहे. येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत आर्यनच्या जामीन अर्जावरील सुनावणी अपेक्षित आहे.


हेही वाचा आर्यन खानला सतीश मानेशिंदे जामीन मिळवून देऊ शकले नाहीत, किंग खानने वकिलच बदलला

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -