साडेसाती, शनी पिडा सतावतेय तर ८ जानेवारीला करा ‘हे’ उपाय, शनीची होईल कृपादृष्टी

शनी देवाला (Shani Dev ) प्रसन्न करण्यासाठी शनिवार (Saturday ) हा सर्वांत चांगला दिवस मानला जातो. ज्यांना शनी पिडा (Shani Pida) आहे त्यांनी या दिवशी सूर्यास्तानंतर सुमसान ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.

मकर राशीत (Capricorn)  शनी देव (Shani dev )  विराजमान आहेत. जानेवारी महिना हा शनी भक्तांसाठी विशेष असणार आहे. १४ जानेवारीला सूर्य देव (Surya Dev )  शनीच्या घरात जाणार आहे. या दिवसाला मकर संक्रांती (Makar Sankranti 2021)  असे म्हणतात. मकर संक्रांतीला सूर्य देव त्यांच्या मुलाच्या घरी येतात. मकर राशीत या दिवशी शनी आणि सूर्य यांची युती होते. त्याचप्रमाणे बुध ग्रह (budh Grah) ही मकर राशीत प्रवेश करतो. मात्र त्याआधी ८ जानेवारी रोजी शनी देवाला प्रसन्न करण्याची एक संधी आहे. शनी देवीचे आशिर्वाद मिळवण्यासाठी हा चांगला योग आहे.

ज्योतिष शास्रानुसार, धनु राशी, मकर राशी आणि कुंभ राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे. कुंडलीनुसार, शनी जेव्हा अशुभ असतो तेव्हा साडेसातीत सर्वाधिक कष्ट आणि त्रास होतो. साडे साती दरम्यान व्यक्तीला जॉब, बिझनेस, शिक्षण, करियर यासारख्या प्रत्येक गोष्टींमध्ये समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे आरोग्य आणि नवीन लग्न झालेल्या दाम्पत्यांना देखील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मिथुन आणि तुळ राशीवर देखील शनीची साडेसाती सुरू आहे. शनीची छाया शुभ मानली जात नाही. याकाळात कामांमध्ये अनेक अडथळे येतात.

पंचांगानुसार, ८ जानेवारीला शनिवारी पौष मास शुक्ल पक्ष षष्ठी तिथी आहे. सकाळी 10:45 ला तिथी सुरू होईल. त्यानंतर शनी उत्तराभाद्रपद नक्षत्रात राहिल. या दिवसात चंद्र मीन राशीत राहील. शनिवारी दुपारी 12:06 पासून 12:48 पर्यंत राहू काळ असेल. या वेळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज असते.

30 वर्षानंतर शनि देवांचा कुंभ राशीत प्रवेश; ‘या’ ४ राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मिळेल चांगला नफा

शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवार हा सर्वांत चांगला दिवस मानला जातो. ज्यांना शनी पिडा आहे त्यांनी या दिवशी सूर्यास्तानंतर सुमसान ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. असे केल्याने शनी देव तुमच्यावर प्रसन्न होईल. त्याचप्रमाणे शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी पुढील गोष्टीही तुम्ही करू शकता.

  • पिंपळाच्या झाडाला पाणी घाला.
  • हनुमानाची पूजा करा.
  • शनिवारी गहू, मका,ज्वारी,तांदूळ,चणे, काळे उडीद दान करा.
  • गरिबांना काळा कपडे दान करा.
  • चपलांचे दान करा.
  • कुष्ठ रोग्यांची सेवा करा.

शनिवारी या गोष्टी लक्षात ठेवा