घरठाणेशीळफाटा-बदलापूर-म्हसा-माळशेज घाट रस्त्याला मिळणार राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

शीळफाटा-बदलापूर-म्हसा-माळशेज घाट रस्त्याला मिळणार राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

Subscribe

शीळफाटा-बदलापूर-म्हसा-माळशेज घाट, या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याबाबत तसेच माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक व गार्डन बांधण्यासाठी डी पी आर तयार करण्याचा आदेशही देण्यात आला

शीळफाटा-बदलापूर-म्हसा-माळशेज घाट, या रस्त्याला राष्ट्रीय वर्गाचा दर्जा मिळणार असून यासाठी लवकरच डीपीआर तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली. त्यामुळे या भागाच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असल्याचा विश्वासही कथोरे यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी  यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दिल्लीतील कार्यालयात बुधवारी ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर कल्याण जवळील शहाड रस्त्यावर असलेल्या ओवरब्रिज मोठा करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली.वरप-कांबा ते माळशेज घाट हा रस्ता चौपदरी करण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी आदेश देण्यात आले.

- Advertisement -

शीळफाटा-बदलापूर-म्हसा-माळशेज घाट, या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याबाबत तसेच माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक व गार्डन बांधण्यासाठी डी पी आर तयार करण्याचा आदेशही देण्यात आला.माळशेज घाटात नवीन बोगदा करणेसाठी २४७८ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीसाठी केंद्रीय पंचायत राज मंत्री तथा भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील, मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार  किसन कथोरे व भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण सोशल मीडिया संयोजक मिलिंद धारवाडकर आदी उपस्थित होते.


हेही वाचा – Driving Licence साठी आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही, खासगी कंपन्यांकडून मिळेल Licence

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -