घरताज्या घडामोडीमुरुडमध्ये मेंढपाळांची भटकंती सुरू

मुरुडमध्ये मेंढपाळांची भटकंती सुरू

Subscribe

दीड वर्षांनी कोरानाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर डोक्यावर भगवा फेटा किंवा पांढरी टोपी, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन जिवाभावाच्या मेंढ्यांची राखण करणारा मेंढपाळ तालुक्यात अनेक ठिकाणी दिसू लागला आहे. उन्हाचे चटके सहन करीत मेंढ्या चराई करण्यासाठी मेंढपाळ भटकंती करीत असतो. तेलवडे रस्त्यावरील शेतामध्ये सध्या मेंढ्यांची गर्दी दिसून येत आहे.शेतकर्‍यांनी शेतातील पिके काढल्यानंतर त्या जमिनीत मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी आणत असतात. पिके निघाल्यानंतर काही दिवसांनी शेतकरी आपली जमीन नांगरतात. त्या ठिकाणी जनावरांना खाण्यासाठी कोणताही चारा राहत नाही. त्यामुळे मेंढपाळांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहात नाही. आठ, पंधरा दिवस, तर कधी महिन्यानंतर त्यांना आपला मुक्काम हलवावा लागतो. या काळात मेंढ्यांच्या लेंड्या आणि मूत्र शेतासाठी चांगले खत म्हणून कामी येत असल्याने स्थानिक शेतकरी शेतात सहारा देतात. प्रसंगी खानपानाची सोयसुध्दा करीत असतात. दिवाळीनंतर मेंढपाळांची सुरू झालेली भटकंती जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतरच थांबते, अशी माहिती सातारा येथील मेंढपाळ गणेश पडळकर यांनी दिली.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -