घरक्राइमअमरावतीमध्ये डोळ्यात मिरची पूड टाकून शिवसेनेच्या शहरप्रमुखाची धारदार शस्राने हत्या

अमरावतीमध्ये डोळ्यात मिरची पूड टाकून शिवसेनेच्या शहरप्रमुखाची धारदार शस्राने हत्या

Subscribe

शहर प्रमुख अमोल पाटील यांची हत्या जुन्या वादातून

अमरावतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीत शिवसेनेच्या शहरप्रमुखाची धारदार शस्राने निर्घूण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा बसस्थानकाजवळ रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांच्यावर हल्ला करुन त्यांच्या डोळ्यात मिरचीच पूड टाकण्यात आली त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी एकूण ४ जणांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्यांची नावे संदीप रामदास ढोबाळे(४२) वर्ष,प्रवीण रामदास ढोबाळे (३०) आणि रुपेश घागरे (२२) व यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. (Shiv Sena mayor was stabbed to death with a sharp weapon In Amravati)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अमोल पाटील मित्रांसोबत दारु पिण्यासाठी गेले असता. चार आरोपींनी त्याच्या विरोधात हत्येचा कट रचून आधी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर धारदार शस्राने त्यांच्यावर सपासप वार करुन त्यांना जागीच ठार केले. अमोल पाटील यांना ठार केल्याने आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षण रिता उईके या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून ३ आरोपींना अकट केली त्यातील १ आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे शहर प्रमुख अमोल पाटील यांची हत्या जुन्या वादातून झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर प्रमुख अमोल पाटील यांच्यावर पूर्वी दोन खून केल्याचा आरोप होता. या प्रकरणी त्यांना दोन वर्षे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.


हेही वाचा – ‘मविआ’तील प्रश्न सोडवण्यासाठी खास टीम, हे सरकार पाच वर्ष टिकणार – शरद पवार

- Advertisement -

 

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -