प्रताप सरनाईक यांची गुरुवली येथील ७८ एकर जागा EDने घेतली ताब्यात

प्रताप सरनाईक यांनी कंपनीच्या नावाने कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती मिळाली असता भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची गुरुवली येथील ७८ एकर जमीन ईडीने ताब्यात घेतली आहे. गुरुवली येथील ११२ सातबारा असलेली ७४.२७ एकर जमिनीवर ईडीने कारवाई करत ताबा घेतला आहे. मंडल अधिकारी यांनी जागेवर जाऊन नोटीस लावली असून माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज या जागेवर जाऊन पाहणी केली असता, नोटीस काढल्याचे समजले.

आमदार प्रताप सरनाईक आणि मोहीत अग्रवाल यांनी एन एस ई एल, कंपनीसाठी दोनशे कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्यातील १०० कोटी रुपये कल्याण तालुक्यातील गुरुवली येथील ७८ एकर जागा खरेदीत गुंतवले. याबाबत कंपनीच्या नावाने कोटी रुपये फसवणूक केली आल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर याबाबत खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. ईडीने संपूर्ण प्रकाराची चौकशी केली आणि अखेर १०० कोटी रुपये भरण्यासाठी सांगितले होते. ते न भरल्याने गुरुवली येथील ७८ एकर जमीन ताब्यात घेत त्याबाबत नोटीस लावली आहे.

सोमय्यांचा ठाकरे सरकारवर आरोप

यावेळी ठाकरे सरकारचे एकामागून एक घोटाळे बाहेर पडत असल्याने घाबरलेल्या ठाकरे सरकारने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यापूर्वी देखील त्यांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पत्रकारांना सामाजिक कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भाजपचा कोणताही कार्यकर्ता ठाकरे सरकारला भीत नाही. आता उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजला जाणाऱ्या प्रताप सरनाईक यांचा तिसरा घोटाळा समोर आला आहे. त्यांची ७८.२७ एकरची जमीन ईडीने जप्त केली आहे. जनतेची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्वाची असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.


हेही वाचा – ठाण्यात बर्ड फ्लूसाठी हेल्पलाईन