घरक्राइमCruise Drug Case : पब्लिसिटीसाठी सेलिब्रिटी NCB च्या रडारवर, शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात...

Cruise Drug Case : पब्लिसिटीसाठी सेलिब्रिटी NCB च्या रडारवर, शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Subscribe

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी असलेल्या आर्यन खानच्या मूलभूत अधिकारांच्या निमित्ताने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. (Shivsena moves to supreme court demanded NCB officers judicial enquiry)

या संपुर्ण प्रकरणात एनसीबी अतिशय दुर्भावनेने आणि बदला घेत काम करत असल्याचे याचिकेत नमुद करण्यात आले आहे. या यंत्रणेचे अधिकारी हे गेल्या दोन वर्षांपासून काही निवडक सेलिब्रिटी आणि ठराविक मॉडेल्सला लक्ष्य करत आहेत. म्हणूनच एनसीबीच्या अधिकाऱ्यांची या प्रकरणातील भूमिका जाणून घेण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संपुर्ण प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांचीही विशेष चौकशी होणे गरजेचे आहे. याचिकेच्या माध्यमातून एनसीबीच्या अधिकाऱ्यांची न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. आर्यन खानच्या जामीन प्रकरणावर उद्या म्हणजे बुधवारी २० ऑक्टोबरला सत्र न्यायालयात सुनावणी होणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

आर्यन खानच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. म्हणून या प्रकरणात न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घ्यावी अशीही भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आली आहे. काही सेलिब्रिटी एनसीबी टार्गेट करत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे. त्यामुळेच या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने धाव घेतली आहे. या प्रकरणात न्यायाधीशांकडून एनसीबीच्या भूमिकेची आणि अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशीही मागणी शिवसेनेने केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संपुर्ण प्रकरणात आर्यन खानच्या समुपदेशनाच्या मुद्द्यावर प्रश्न केला आहे. आर्यन खानचे समुपदेशन तुरूंगात केले का ? अशी विचारणा करत हा पब्लिसिटी स्टंट असल्याची विचारणा त्यांनी केली आहे. तसेच हा सगळे प्रकरण पल्बिसिटी स्टंट असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणात एनसीबीच्या मदतीला असलेल्या स्वतंत्र पंचांच्या विषयावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणातील एक पंच असलेल्या किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी आता सर्च वॉरंट जारी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना NCB ची पंच म्हणून नेमणूक, शरद पवारांचे एनसीबीवर टीकास्त्र

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -