घरताज्या घडामोडीशिवसेना अजूनही एनडीएतच, राहूल शेवाळेंनी केलं स्पष्ट

शिवसेना अजूनही एनडीएतच, राहूल शेवाळेंनी केलं स्पष्ट

Subscribe

तसेच, शिवसेना अजूनही एनडीएतच आहे, असंही ते म्हणाले. १२ खासदारांनी आज शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे.

लोकसभेतील गटनेता बदलावा अशी विनंती करण्यात येत होती. मात्र, गटनेता बदलला गेला नाही. परंतु, लोकसभेच्या प्रतोद भावना गवळी यांना गटनेता बदलण्याचा पूर्ण अधिकार असल्याने त्यांनी गटनेता बदलला, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी दिलं आहे. तसेच, शिवसेना अजूनही एनडीएतच आहे, असंही ते म्हणाले. १२ खासदारांनी आज शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानिमित्ताने या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. (Shivsena still in NDA,says Rahul Shewale)

हेही वाचा – युतीसाठी उद्धव ठाकरे यांची मोदींसोबत एक तास चर्चा, राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

- Advertisement -

शिवसेना अजूनही एनडीएतच आहे. एनडीएतून बाहेर पडल्याचं पत्र शिवसेनेने दिले नाही. त्यामुळे एनडीएकडे शिवसेनेचे जॉईन झाल्याचे पत्र अजूनही आहे. तसेच, शिवसेनेने युपीए जॉईन केल्याचेही पत्र नाही. त्यामुळे शिवसेना अजूनही एनडीएतच असल्याचं सिद्ध होतंय. त्यामुळे शिवसेना अजूनही एनडीएतच आहे, अशी स्पष्टोक्ती राहूल शेवाळे यांनी केली.

राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेसह शिंदे गटाने एनडीएला पाठिंबा दिला होता. मात्र, उपराष्ट्रपती पदाला शिंदे गट कोणाला पाठिंबा देणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. दरम्यान, राहूल शेवाळे म्हणाले की आमचा पाठिंबा एनडीएच्या उमेदवाराला असेल.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेनेच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून लोकसभाध्यक्षांना पत्र दिलं, एकनाथ शिंदेंची माहिती

एनडीएत जाण्याची चांगली संधी

शिवसेनेला एनडीएत जायचं तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिला तर आपल्याला एनडीएत जामं सोपलं होईल. राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला. मात्र, युपीएने उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली. त्या महाराष्ट्राच्या प्रभारी होत्या तेव्हा त्यांनी शिवसेनेला खूप त्रास दिला आहे. अशावेळी त्यांना उपराष्ट्रपती पदी निवडून देणं योग्य वाटत नाही. त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्याच उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी आम्ही ठाकरेंना केली. मात्र, संजय राऊत मविआच्या बैठकींना हजर राहतात. उपराष्ट्रपती पदासाठी कोणाला उमेदवारी द्यायची या बैठकीला राष्ट्रवादीसोबत बसतात. हे आम्हाला पटलं नाही. त्यामुळे कठोर होऊन आम्ही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा – शिवसेनेचे कार्यालय ताब्यात देण्याची शिंदे गटाची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -