धक्कादायक ! आई-बापाची मुलासह फाशी ; आत्महत्येपूर्वी केला व्हिडीओ, म्हणाले…

हरियाणामधील एका गावातील घरात आई- बापाने मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मनं सुन्न करणाऱ्या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना समोर येताच एसपी नरेंद्र बिजरानिया आणि एएसपी कुलदीप सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्या तिघांना फाशीवरुन उतरवण्यात आले. त्यानंतर त्या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आले.

एसपींच्या माहितीनुसार,पोलिसांनी या घटनेमधील मृतांचा भाचा नरेश पुत्र बलराजची चौकशी केली. या चौकशी दरम्यान मृतांची नावे समोर आली आहेत.४८ वर्षीय ओम प्रकाश,४५ वर्षीय कमलेश आणि २० वर्षाचा मुलगा सोनू अशी मृत व्यक्तींची ओळख पटली आहे. या तिघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी आणि व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल केला.ज्याद्वारे या घटनेची तपासणी करत पुढील कारवाई करणार आहेत.आत्महत्या करण्यापूर्वी २० वर्षीय मुलाने चिठ्ठीत पोलिसांना अनेक प्रश्न विचारले असून,”मी आणि माझे आई-वडील खुनी नाही आहोत,आणि आम्हाला माहीत आहे की, नन्हूंचा खून कोणी केला आहे ते” असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

मात्र,नातेवाईकांचे असे म्हणणे आहे की, गढी पोलिस स्टेशनचे प्रभारी पवन कुमार यांनी खोट्या आरोपाखाली या संपूर्ण कुंटूंबाला फसवण्याचा प्रयत्न केला.त्यांनी या मृत तिघांनीही पोलिसांच्या या खोट्या आरोपाखाली अडकवण्याच्या जाचाला कंटाळून त्यापासून सुटका मिळवण्यासाठी हा आत्महत्येचा मार्ग पत्करला.

२१ नोव्हेंबरला मृतांच्या परिवारातील मनीराम ऊर्फ नन्हू नावाचा व्यक्ती गायब झाला होता. त्यानंतर नन्हूच्या गायब होण्याची गढी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांना तपासणी करताना २९ नोव्हेंबरला नन्हूचा मृतदेह गोणीत बांधलेल्या स्थितीत सापडला.त्याच्या मृत्यूप्रकरणी ४८ वर्षीय ओम प्रकाश,४५ वर्षीय कमलेश आणि २० वर्षाचा मुलगा सोनू या तिघांची कसून चौकशी करत खोट्या आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न गढी पोलिसांनी केला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.


हे ही वाचा – श्रीनगरमध्ये मोठी दुर्घटना टळली; सुरक्षा दलासोबत घातपात करण्यासाठी ठेवलेले ५ किलो IED जप्त