घरक्राइमअंडी उधार न दिल्याच्या रागातून दुकानदाराची हत्या

अंडी उधार न दिल्याच्या रागातून दुकानदाराची हत्या

Subscribe

अंडी उधार न दिल्याच्या रागातून एका दुकानदाराची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे.

अंडी उधार न दिल्याच्या रागातून एका दुकानदाराची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सातारा हादरुन गेला आहे. साताऱ्याच्या बोगदा परिसरात ही घटना घडली असून यामध्ये दुकानदार बबन हणमंत गोखले (४२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी शुभम कदम आणि सचिन माळवे या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील यवतेश्वर हाऊसजवळ बबन हणमंत गोखले यांचे दुकान आहे. दरम्यान, यांच्या दुकानात शुभम आणि सचिन माळवे अंडी आणण्यासाठी गेले होते. त्यांनी बबनकडे उधारी अंडी मागितली. पण, बबनने उधारी अंडी देण्यास नकार दिला. नकार दिल्याच्या रागात शुभम आणि सचिन यांनी बबनला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बबनव दगडांनी आणि धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. यामध्ये बबन यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण सातारा शहर हादरलं आहे.

- Advertisement -

याप्रकरणी शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी शुभम कदम, सचिन माळवे या दोघांना पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी फक्त अंडी उधार न देण्याच्या रागातून ही हत्या केली की यामागे आणखी काही कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.


हेही वाचा – भयंकर! इन्टाग्राम मॉडेलने आईचं काळीज काढलं बाहेर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -