घरताज्या घडामोडीश्रावण महिना २०२० : श्रावण महिन्यातील खास व्रतांबद्दल जाणून घ्या!

श्रावण महिना २०२० : श्रावण महिन्यातील खास व्रतांबद्दल जाणून घ्या!

Subscribe

जुलै महिना सुरू होताच समस्त महिला वर्गांना वेध लागतात ते श्रावण महिन्याचे. श्रावण महिना हिंदू धर्मात खूप शुभ समजला जातो. या महिन्यात अनेक उपवास, व्रत- वैकल्य केली जातात. अनेक सणही याच महिन्यात येतात. श्रावमातील सोमवाराला आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. अनेक शिवभक्त श्रावणात न चुकता सोमवारचं व्रत पाळतात. यावर्षी श्रावण महिना २१ जुलैपासून सुरु होणार आहे. मात्र, याचा पहिला श्रावणी सोमवार हा २७ जुलैला असणार आहे.

श्रावण महिन्यात शास्त्रानुसार सोमवारी तीन प्रकारचे व्रत करतात.. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष. सोमवार व्रताची विधी सर्व व्रतांप्रमाणेच असते. या व्रताची सुरूवात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून केली जाते. श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते.

- Advertisement -

असं करा श्रावणी सोमवारचं व्रत

श्रावणात सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करतात. त्यानंतर पार्वती आणि शंकराची एकत्र पूजा केली जाते. यानंतर देवाला फुले अर्पण केली जातात. त्यानंतर आरती केली जाते. यानंतर चालिसाचे पठण करतात. सोमवार व्रत ही कथा वाचली किंवा ऐकली जाते. ध्यान झाल्यानंतर ऊँ नमः शिवाय, ऊँ नमः शिवायै’ असं म्हणत देवी पार्वतीची पूजा केली जाते.


हे ही वाचा – श्रावण… निसर्गाचा उत्सव

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -