घरताज्या घडामोडीगिरगावकरांचा लाडका बाप्पा

गिरगावकरांचा लाडका बाप्पा

Subscribe

गिरगाव किंवा दक्षिण मुंबई मधल्या जुन्या मंदिरापैकी एक अस या फडके वाडी गणपती मंदिराच वर्णन करता येईल.फडके वाडी म्हणून ओळखली जाते त्यावेळी औषधी वनस्पती ने युक्त झाडांनी गर्द अशी ही फडके वाडी होती. अनेक दुर्मिळ वनस्पती आणि औषधी वनस्पती मध्ये हा बाप्पा विराजमान झालेला होता

– सिद्धी सुभाष कदम 

गिरगावला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. गिरगावात अनेक पुरातन मंदिर आणि वास्तू आहेत. त्यातील श्री फडके वाडी गणपती मंदिराविषयी आपण जाणून घेऊया. श्री फडके वाडी गणपती मंदिर साधारण १३० वर्ष जुने आहे. रिद्धी सिद्धी सोबत असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती जगात फक्त तीन आहेत त्यात ह्या फडके वाडी गणपती मंदिराचा समावेश होतो. गिरगाव किंवा दक्षिण मुंबई मधल्या जुन्या मंदिरापैकी एक अस या फडके वाडी गणपती मंदिराच वर्णन करता येईल.

साधारण १८९० च्या सुमारास यशोदाबाई फडके आणि गोविंद फडके हे जोडप रायगड जिल्ह्यातील नागाव येथून मुंबईला आल.ही जी फडके वाडी म्हणून ओळखली जाते त्यावेळी औषधी वनस्पती ने युक्त झाडांनी गर्द अशी ही फडके वाडी होती. अनेक दुर्मिळ वनस्पती आणि औषधी वनस्पती मध्ये हा बाप्पा विराजमान झालेला होता.या मंदिराच अजून वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या मंदिरात वरती एक माडी आहे. ही माडी खास स्त्रियासाठी असून पूर्वीच्या काळात स्त्रियांना कार्यक्रमासाठी फार बाहेर जायची परवानगी नव्हती तेव्हा इथे वर बसून त्या भजन कीर्तनासारखे पारंपारिक कार्यक्रम ऐकत असत.

- Advertisement -

समाजाच आपण काही देण लागतो. न्यायाने यशोदाबाईनी येथे एका ट्रस्ट ची स्थापना केली. या ट्रस्ट तर्फे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात.जसाजसा भारत बदलत गेला तसतस मंदिरातही अनेक बदल घडत गेले परंतु मंदिराने आपला सांस्कृतिक वारसा तसाच जपला आहे.कारण आपण म्हणतो हिंदू धर्मा मध्ये परंपरा आणि संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते महत्व तसचं राहावं हा ट्रस्ट चा उद्देश आहे.

जे काही कार्यक्रम वर्षानुवर्ष सुरू आहेत ते परंपरेने असेच चालत आलेले आहेत. त्यात कीर्तन आहे प्रवचन आहे त्याचप्रमाणे धार्मिक मेळे आहेत. ज्ञानउपयोगी अस समाजाला दान देण्यासाठी ज्ञानवर्धिनी उत्सव केला जातो. आजही देशभरातून अत्यंत श्रद्धेने भाविक बाप्पा च्या दर्शनाला येत असतात. अंगारकी चतुर्थी ला अन्नदानाचा कार्यक्रम मंदिरातर्फे केला जातो.या ठिकाणी कुठल्याही प्रकार च्या अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही आणि म्हणूनच जनसेवा हीच जनार्दन सेवा आहे याचा प्रत्यय मंदिरात आल्यावर होतो.

- Advertisement -

हेही वाचा –  शिर्डीपाठोपाठ पंढरपुरातील श्रीविठ्ठल, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी रात्री ९ नंतर ‘नो एन्ट्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -