घरताज्या घडामोडीकरोनामुळे सिंगापूरमध्ये एसीच्या वापरास मनाई

करोनामुळे सिंगापूरमध्ये एसीच्या वापरास मनाई

Subscribe

करोना व्हायरसने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये करोनाच्या संसर्गामुळे झालेल्या जीवितहानीमुळे इतर देशही सतर्क झाले आहेत. सिंगापूरने ही आपल्या देशातील नागरिकांना निर्देश जारी केले असून एसी वापरण्यावर बंदी आणली आहे.

करोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले आहे. नागरीकांचं जगणं मुश्कील झाले आहे. त्याची धग संपूर्ण जगाला लागली असून अर्ध्या जगात करोनाचे रुग्ण आढळले आहेत. जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत, हाँगकाँग, सिंगापूर या देशांमध्ये करोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. या आधीही स्वाईन फ्लूसारख्या व्हायरसने जगाला तंगवले होते. चीनमध्ये करोनाच्या संसर्गामुळे झालेल्या जीवितहानीमुळे इतर देशही सतर्क झाले असून सिंगापूरने ही आपल्या देशातील नागरिकांना निर्देश जारी केले असून एसीच्या वापरास चक्क मनाई केली आहे.

हा व्हायरस संसर्गजन्य असल्याने हवेच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होतो. करोना व्हायरसची लागण झाल्यास ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे, घरातील एअर कंडिशनर बंद ठेवण्याचे निर्देश सिंगापूर प्रशासनाने दिले आहेत. तसेच, ताज्या हवेसाठी पंख्याचा वापर करण्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. चीनमधील तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या सूचना केल्या जात आहेत. तसेच, नागरीकांना सतर्कता राखण्याचेही आव्हान केले जात आहे.

चीनचे शांघाय सिव्हील अफेयर्स ब्युरोचे ‘झेंग क्यून’ यांनी सांगितले की, ” करोना व्हायरसचा संसर्ग विषाणूबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, हवेतून होणाऱ्या संसर्गामुळे करोनाची लागण होऊ शकते.”

- Advertisement -

तर, ऑस्ट्रेलियातील प्रा. इयान मॅके यांनी सांगितले की, ” करोना व्हायरसचा संसर्ग हवेतून पसरू शकतो. मात्र, त्यासाठी आणखी ठोस पुरावे हवेत. हवेतून करोनाचा संसर्ग होण्यासाठी इतर काही घटकही कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -