पालघरमध्ये किसान सभेचे ठिय्या आंदोलन

पालघरच्या वाडा तालुक्यात अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्यामुळे वातावरणात प्रदूषण वाढत आहे.

Sit-in agitation of Kisan Sabha of Palghar
पालघरमध्ये किसान सभेचे ठिय्या आंदोलन

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कारखानदारी मधून निघणाऱ्या वायू आणि सांडपाण्याच्या प्रदूषणाने शेतकऱ्याच्या शेतीची आणि मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यासारख्या अनेक मागण्यासाठी किसान सभेच्या माध्यमातून वाडा तहसील कार्यालयासोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. वाडा तालुक्यातील पालसई,अंबिस्ते या भागातील कारखानदारी निघणाऱ्या वायू ,द्रव पदार्थांच्या प्रदूषणाने शेतकऱ्याच्या भात शेतीचे नुकसान होत आहे. तसेच डाकिवली येथे रस्ता अडविल्याने रस्ता बंद झाला त्यामुळे पाण्याचा निचरा न होऊ शेतीचे नुकसान झाले असे अनेक प्रश्न मोर्चे आंदोलने करूनही न सुटू शकल्याने आज किसान सभेच्या वतीने ठीय्या आंदोलन करण्यात आले.

पालघरच्या वाडा तालुक्यात अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्यामुळे वातावरणात प्रदूषण वाढत आहे. या गोष्टीसाठी आम्ही प्रशासनाकडे गेली दोन वर्षे मागणी करत आहोत.पण आमचे प्रश्न सोडवले जात नाही आहेत.गेली दोन वर्षे आम्ही या प्रश्नावर दाद मागत आहोत. आमता हा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून का सुटक नाही याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. असे वाडा तालुक्याचे अध्यक्ष सुनिल पाटिल यांनी सांगितले आहे.

साधारणपणे मागची दोन वर्षांपासून आमची ही लढाई सुरू आहे. कारखान्यातून येणाऱ्या केमिकलयुक्त सांडपाण्याचा पिण्याच्या पाण्यावर परिणाम होत आहे. त्याबरोबर हवेतील प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. कोरोनासारख्या विषाणूला आज अनेक माणसे बळी पडत आहेत.त्याचबरोबर या कंपन्याच्या केमिकलयुक्त पाणी आणि हवेतील प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत आहे. या सर्व गोष्टी प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणूनही प्रशासन त्यावर कारवाई करत नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहे,असेही ते म्हणाले.


हेही वाचा – ‘हे’ बलिदान वाया नाही जाणार,एसटी कर्मचाऱ्यांनी पुढे केला मदतीचा हात!