घरक्राइम..तर आता गुंडागर्दी खपवून घेणारे 'ठाणे' ओळख अशी होईल

..तर आता गुंडागर्दी खपवून घेणारे ‘ठाणे’ ओळख अशी होईल

Subscribe

खासदार राजन विचारे यांचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

ठाणे: किसननगर येथे शिंदे गटाकडून ठाकरे गटावर झालेला हल्ला आणि निष्ठावंत शिवसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे आता ठाकरे गटाला चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्या हल्ल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांचा दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सांस्कृतिक शहर असलेली ठाण्याची ओळख , तुम्हच्या या अशा वागणुकीमुळे गुंडागर्दी खपवून घेणारे ‘ठाणे’ अशी व्हायला वेळ लागणार नाही. असे म्हणताना. आमच्या संयमाला भ्याडपणा समजू नका, आम्ही लढणार कायद्याने आणि लोकशाहीने तसेच जनतेच्या साथीने. आम्हाला तडीपार करा, खोट्या तक्रारी टाका, आमच्या मागे चौकशी लावा तसेच गटबाजी करा किंवा अंगावर यायचे तर अंगावर, हा संघर्षाचा थांबणार नाही. असा असा इशारा शिंदे गटाला दिलेला आहे.

याचदरम्यान महिलांना मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जाणारे शिवसैनिक बाळासाहेब किंवा धर्मवीरांचे शिवसैनिक असू शकत नाही असे म्हणून पोलीस तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून तुम्ही पोलीस इन्चार्ज कडे तक्रार करता आणि गुंडाकडून आमच्यावर हल्ला घडविता, हेच का तुमचे हिंदुत्व असा सवाल ही या व्हायरल व्हिडिओमध्ये ठाकरे गटाने शिंदे गटाला केलेला आहे.

- Advertisement -

इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या तीन मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला सत्याच्या बाजूने लढायचे ठरवले. म्हणून संयम कायम आहे,कधी काळी हातात हात घेऊन भगव्यासाठी झटणारे शिवसैनिक आज एकमेकांमध्ये लढतात, हे चित्र ठाण्याने कधीच पाहिले नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्यांनो तुम्ही जनतेची दिशाभूल करताय किंवा तुमची दिशाभूल झाली आहे. बाळासाहेबांनी किंवा धर्मवीरांनी ही शिकवण दिली नव्हती, समाजकारणाच्या पडद्याआड राजकीय उद्देश केव्हाही साधला नाही त्यांनी अन्यायाविरुद्ध फक्त संघर्ष केला. त्याचे फलित म्हणजे ही शिवसेना.

तुम्हाला फक्त सत्तेची पडली आहे म्हणून ठाण्यात तुम्हाला विरोध करणाऱ्या शिवसैनिकांवर तुम्ही ठोकशाही दाखवता,असे म्हटले आहे. तसेच पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सात तास पोलीस ठाण्याच्या बाहेर तमाशा करणे यालाच तुमची मर्दांगी समजता काय? असा खोचट सवाल उपस्थित केला आहे. अहो, पोलिसांसमोर तडीपार असलेला सिद्धू अभंगे या गुंडाने शिवसैनिकांवर हल्ला केला, एवढेच नाहीतर महिला पदाधिकाऱ्यांवर जमाव धावून गेला. महिलांना मारहाण करणाऱ्यांसाठी त्यांच्या अंगावर धावून जाणारे  शिवसैनिक बाळासाहेब किंवा धर्मवीर यांचे असू शकत नाही.असेही म्हटलेले आहे. पोलिसांनी लाठी चार्ज केला असा आरोप करताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही का? असा सवालही केला आहे. तसेच शेवटी म्हणताना, एक गोष्ट लक्षात ठेवा आमच्या संयमाला भ्याड समजू नका आम्ही लढणार कायद्याने आणि लोकशाहीने तसेच जनतेच्या साथीने, तुम्ही तडीपार करा व खोट्या केसेस टाका , चौकशी मागे लावा व गटबाजी करा किंवा अंगावर यायचे तर अंगावर या! हा संघर्ष आता थांबणार नाही जोवर शिवसैनिक पुन्हा एकदा ठाण्यावर भगवा फडकवत नाही तोवर असेच असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -