Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Breaking: आपण महामारीच्या उंबरठ्यावर, त्यामुळे उंबरठा ओलांडू नका - पंतप्रधान

Breaking: आपण महामारीच्या उंबरठ्यावर, त्यामुळे उंबरठा ओलांडू नका – पंतप्रधान

Related Story

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, करोनाचा बाधित एक व्यक्ती केवळ एका आठवड्यात शेकडो लोकांना हा आजर देऊ शकतो. जेव्हा हा आजार पसरतो तेव्हा त्याला थांबवणे कठीण होऊन बसते. जगभरात करोनाचे १ लाख रुग्ण संख्या होण्यास ६७ दिवस लागले, तर पुढचे १ लाख रुग्ण संक्रमण होण्यास ११ दिवस लागले. पुढच्या केवळ ४ दिवसात ३ लाख संख्या गाठली होती. यातूनच या विषाणूची भीषणता दिसून येते. चीन, इटली, इराण, जर्मनी, स्पेन या देशांमध्ये करोनाने पसरणे सुरु केले, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली. इटली किंवा अमेरिका या देशातील आरोग्य व्यवस्था जगातील सर्वात दर्जेदार व्यवस्था मानली जाते, तरिही ते नियंत्रण मिळवू शकले नाही. त्यामुळे करोनावर प्रतिबंध आणण्यासाठी आपल्याला इतर देशांचा अनुभव लक्षात घ्यावा लागेल. या देशांतील नागरिक अनेक आठवडे घरातून बाहेर पडले नाहीत. त्यामुळे हे देश या महामारीतून बाहेर पडले आहेत, असे सांगत पुढचे २१ दिवस उंबरठा ओलांडू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील इतर मुद्दे – 

आपल्याला देखील हे मान्य केले पाहीजे, आपल्याला घरातून बाहेर पडायचे नाही आहे. काहीही झाले तरी आपल्याला घरातच राहायचे आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांपासून ते गावातील शेवटच्या नागरिकांपर्यंत प्रत्येकाला घरात राहायचे आहे. आपल्याला करोनाचे विषाणूची चैन मोडायची आहे.

भारत आज त्या स्टेजवर आहे, जिथे आपला आजचा निर्णय ठरवेल की आपण या संकटाला किती कमी करणार ते…

- Advertisement -

ही वेळ पावलो पावलो काळजी घ्यायची आहे. शेवटी जान है तो जहान है…

जोपर्यंत देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. तोपर्यंत हे वचन आपल्याला पाळायचे आहे.

- Advertisement -