सोलापूर : दिवसेंदिवस राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचारा झाल्याची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्यापूर्वी बदलापूर अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कारामुळे हादरलं होतं. या घटना ताज्या असतानाच आता सोलापुरात एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर जबरदस्ती केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शिक्षकाविरुद्ध पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Solapur Crime Teacher molests student in Solapur Case registered under POCSO)
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या प्रेमाची कबुली दिली. पण विद्यार्थिनीने त्याला नकार दिला. त्यावर शिक्षकाने विद्यार्थिनीला धमकी द्यायला सुरूवात केली. ‘मला सोडून जाऊ नकोस, अन्यथा मी काहीतरी बरेवाईट करून घेईन’, असं म्हणत तिला शिक्षकाने धमकी दिली. मात्र तरिही विद्यार्थिनीने त्याला नकार दिला. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, आरोपीविरोधात पोस्को कलम 12 सह भारतीय न्याय संहिता कलम 74, 78, 351 (2) अन्वये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
याशिवाय, पोलिसांनी पीडित मुलीचा फिर्याद नोंदवून घेतली. त्यानुसार, शिक्षकाने जुलै 2023 मध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीला संवाद साधून प्रपोज केले. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक सतत पाठलाग करत होता. जानेवारी 2024 मध्ये हात धरून जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला, असे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसह छेडछाड, विनयभंग, अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. नुकातच मुंबईतील वनराई पोलीस स्टेशन परिसरात एका 20 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. तसेच, बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. याप्रकरणी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली. बदलापुरच्या या घटनेनंतर राज्यात आणखी अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.
हेही वाचा – Dhananjay Munde : माझ्या राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीस आणि पवार स्पष्ट उत्तर देतील – धनंजय मुंडे