घरताज्या घडामोडीSolapur Railway Update :- सोलापूर विभागातून धावणा-या 15 गाड्या २८ ऑक्टोबरपर्यंत रद्द...

Solapur Railway Update :- सोलापूर विभागातून धावणा-या 15 गाड्या २८ ऑक्टोबरपर्यंत रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल

Subscribe

१४ ऑक्टोबरपासून दुहेरीकरणाचे काम करण्यात आले आहे.

सोलापूर विभागात  भलवणी आणि भिगवण दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरु आहे.या कामामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भाळवणी ते वाशिंबे या स्थानकादरम्यान २६.३३ किमीचे दुहेरीकरणाचे काम सुरु करण्यात येत असून, या कामाला १४ ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात येत आहे. दुहेरीकरणाच्या कामामुळे सोलापूर विभागातून धावणा-या १५ गाड्या २८ ऑक्टोबरपर्यंत रद्द तर ३५ गाड्यांच्या मार्गात बदलाची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तरी प्रवाशांनी वळविण्यात आलेल्या आणि रद्द झालेल्या ट्रेनची नोंद घ्यावी आणि इतर चौकशीसाठी www.enquiry.indianrail.gov.in/ntes ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

‘या’ मार्गातून गाड्या वळवण्यात आल्या आहेत

१) 01201 लोकमान्य टिळक टर्मिनस- मदुराई साप्ताहिक विशेष दि. २० ऑक्टोबर २०२१ आणि २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुटणाऱ्या ट्रेन रोहा- मडगाव- मंगळुरू जं- शोरानूर- पलक्कड- इरोड- तिरुचिरापल्ली जं. मार्गे वळविण्यात येतील.

- Advertisement -

२) 01202 मदुराई- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष दि. २२ ऑक्टोबर २०२१ रोजी सुटणारी ट्रेन तिरुचिरापल्ली जं. -इरोड -पलक्कड – शोरानूर- मंगळुरु जं. – मडगाव – रोहा मार्गे वळविण्यात येतील.

३) 02882 भुवनेश्वर-पुणे साप्ताहिक विशेष दि. १९ ऑक्टोबर २०२१ आणि २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सुटणाऱ्या ट्रेन वाडी- सोलापूर- कुर्डूवाडी- मिरज – पुणे मार्गे वळविण्यात येतील.

- Advertisement -

४) 02881 पुणे-भुवनेश्वर साप्ताहिक विशेष दि. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सुटणारी ट्रेन पुणे -मिरज -कुर्डुवाडी – सोलापूर मार्गे वळविण्यात येतील.

५) 06340 नागरकोईल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष (आठवड्यातून चार दिवस) दि. १८ ऑक्टोबर २०२१ ते २६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन डिंडीगुल – नमक्कल- इरोड- पलक्कड – शोरानूर- मंगळूरू जं- मडगाव -रोहा- पनवेल -ठाणे मार्गे वळविण्यात येतील.

६) 06339 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – नागरकोईल विशेष (आठवड्यातून चार दिवस) दि. १९ ऑक्टोबर २०२१ ते २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन ठाणे- पनवेल – रोहा -मडगाव -मंगळुरू जं-शोरानूर- पलक्कड- इरोड- नमक्कल -डिंडीगुल मार्गे वळविण्यात येतील.

७) 06352 नागरकोइल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई मुंबई विशेष (द्वि-साप्ताहिक) दि. २१ ऑक्टोबर २०२१ आणि २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सुटणाऱ्या ट्रेन तिरुचिरापल्ली – इरोड- पलक्कड -शोरानूर- मंगळूरू जं- मडगाव- रोहा- पनवेल- ठाणे मार्गे वळविण्यात येतील.

८) 06351 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – नागरकोईल विशेष (द्वि-साप्ताहिक) दि. १८ ऑक्टोबर २०२१ ते २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन ठाणे -पनवेल- रोहा- मडगाव – मंगळुरू जं-शोरानूर- पलक्कड- इरोड- तिरुच्चिराप्पल्ली मार्गे वळविण्यात येतील.

९) 08520 लोकमान्य टिळक टर्मिनस- विशाखापट्टणम विशेष दि. १८ ऑक्टोबर २०२१ ते २८ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस- इगतपुरी -मनमाड- नांदेड -निजामाबाद – सिकंदराबाद मार्गे वळविण्यात येतील.

१०) 08519 विशाखापट्टणम -लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. १८ ऑक्टोबर २०२१ ते २६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन सिकंदराबाद- निजामाबाद- नांदेड -मनमाड -इगतपुरी- लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गे वळविण्यात येतील.

११) 01017 लोकमान्य टिळक टर्मिनस – कारैक्काल साप्ताहिक विशेष दि. १६ ऑक्टोबर २०२१ आणि २३ ऑक्टोबर २०२१ रोजी सुटणाऱ्या ट्रेन पुणे- मिरज- हुब्बळी -यशवंतपूर- जोलारपेट्टाई- काटपाडी- वेल्लोर- विल्लुपुरम मार्गे वळविण्यात येतील.

१२) 01018 कारैक्काल- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष दि. १८ ऑक्टोबर २०२१ आणि २५ ऑक्टोबर २०२१ रोजी सुटणाऱ्या ट्रेन विल्लुपुरम -वेल्लोर- काटपाडी -जोलारपेट्टाई- यशवंतपूर- हुब्बळी – मिरज-पुणे मार्गे वळविण्यात येतील.

१३) 07221 काकीनाडा पोर्ट लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (द्विसाप्ताहिक) दि. १६ ऑक्टोबर २०२१ ते २३.१०.२०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन सोलापूर – कुर्डुवाडी -मिरज -पुणे मार्गे वळविण्यात येतील.

१४) 07222 लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा बंदर विशेष (द्विसाप्ताहिक) दि. १७ ऑक्टोबर २०२१ ते २४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन पर्यंत पुणे -मिरज – कुर्डुवाडी – सोलापूर मार्गे वळविण्यात येतील.

‘या’ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत…

१) 01139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई -गदग विशेष दि. १४ ऑक्टोबर २०२१ ते २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

२) 01140 गदग -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष दि. १५ ऑक्टोबर २०२१ ते २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

३) 02116 सोलापूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष दि. १७ ऑक्टोबर २०२१ ते २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

४) 02115 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- सोलापूर विशेष दि. १८ ऑक्टोबर २०२१ ते २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

५) 02207 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- लातूर विशेष (आठवड्यात ४ दिवस) दि. १८ ऑक्टोबर २०२१ ते २६.१०.२०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

६) 02208 लातूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष (आठवड्यात ४ दिवस) दि. १९ ऑक्टोबर २०२१ ते २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

७) 02043 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- बिदर विशेष (त्रि-साप्ताहिक) दि. २० ऑक्टोबर २०२१ ते २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

८) 02044 बिदर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष (त्रि-साप्ताहिक) दि. २१ ऑक्टोबर २०२१ ते २४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

९) 07614 नांदेड- पनवेल विशेष दि. १४ ऑक्टोबर २०२१ ते २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

१०) 07613 पनवेल -नांदेड विशेष दि. १५ ऑक्टोबर२०२१ ते २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

११) 07014 हैदराबाद- हडपसर विशेष (त्रि-साप्ताहिक) दि. १८ ऑक्टोबर २०२१ ते २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

१२) 07013 हडपसर -हैदराबाद विशेष (त्रि-साप्ताहिक) दि. १९ ऑक्टोबर २०२१ ते २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

१३) 01157/01158 पुणे -सोलापूर -पुणे दैनिक विशेष २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन.

१४) 06237 म्हैसूरू- साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष दि. १८ ऑक्टोबर २०२१ आणि २५ऑक्टोबर २०२१ रोजी सुटणाऱ्या ट्रेन.

१५) 06238 साईनगर शिर्डी -म्हैसूर साप्ताहिक विशेष विशेष दि. १९ ऑक्टोबर २०२१ आणि २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सुटणाऱ्या ट्रेन.

खालील गाड्यांची अल्प समाप्ती

१) 01302 केएसआर बेंगळुरू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष दि. १७ ऑक्टोबर २०२१ ते २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेनची सोलापूर येथे यात्राविराम (अल्प समाप्ती) होईल.

2) 01301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- केएसआर बेंगळुरू विशेष दि. १८ ऑक्टोबर २०२१ ते २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुटणाऱ्या ट्रेन सोलापूर येथून सुटतील.

 

मध्य रेल्वेतून जाणाऱ्या खालील विशेष गाड्या ‘या’ काळात वळवण्यात आल्या आहेत.

१) 06229/06230 म्हैसुरू- बनारस द्विसाप्ताहिक विशेष

२) 09054/09053 चेन्नई-अहमदाबाद साप्ताहिक विशेष

३) 09220/09219 चेन्नई- अहमदाबाद साप्ताहिक विशेष

४) 06502/06501 यशवंतपूर- अहमदाबाद साप्ताहिक विशेष

५) 02755/02756 राजकोट- सिकंदराबाद त्रि-साप्ताहिक विशेष

६) 07204/07203 काकीनाडा टाऊन- भावनगर टर्मिनस साप्ताहिक विशेष

७) 09016/09015 इंदूर- लिंगमपल्ली साप्ताहिक विशेष

८) 09120/09119 केवडिया-चेन्नई साप्ताहिक विशेष


हे ही वाचा – सरकारच राज्यात बंद कसा पुकारू शकते?; आठवलेंचा महाविकास आघाडीला सवाल


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -