Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कर्जत आगारातील महत्वाच्या कळंब,ओलमण मार्गावरील एसटी पुन्हा सुरू

कर्जत आगारातील महत्वाच्या कळंब,ओलमण मार्गावरील एसटी पुन्हा सुरू

खासगी वाहनांतून प्रवास करण्यासाठी वाढीव पैसे मोजावे लागल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी उमटली होती.

Related Story

- Advertisement -

कर्जत एसटी आगारचा महत्त्वाचा आणि सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग असलेल्या नेरळ-कळंब आणि ओलमण या गावात जाणार्‍या एसटीच्या फेर्‍या गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. या मार्गावर कळंब ८, तर ओलमणसाठी ३ फेर्‍या होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. एप्रिलच्या लॉकडाऊनमध्ये कर्जत आगाराने ग्रामीण भागातील फेर्‍या बंद केल्या होत्या. त्यात जून महिन्यापासून महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खासगी वाहनांसाठी जास्त पैसे देऊन जावे लागत होते. येथील स्थानकातून पूर्वी ९० फेर्‍या दिवसभरात होत होत्या. मात्र त्या कळंब, पोशीर, ओलमण, बोरगाव, आर्डे, वारे, कशेळे, शिंगढोल, कर्जत, कळंब-कशेळे मार्गे कर्जत, कशेळे मार्गे कर्जत या मार्गावर बस चालविल्या जात होत्या. मात्र कोरोनामुळे सर्व भागांतील फेर्‍या बंद करण्यात आल्या होत्या.

त्यात महाविद्यालयानंतर नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा देखील सुरू झाल्याने पालकांना आधीच लॉकडाऊन आणि त्यात खासगी वाहनांतून प्रवास करण्यासाठी वाढीव पैसे मोजावे लागल्याने तीव्र नाराजी उमटली होती. याबाबत अनेकांनी कर्जत आगाराकडे पत्रव्यवहार केला होता. आगार प्रमुख शंकर यादव यांनी नेरळ-कळंब, नेरळ-ओलमण-नेरळ, कळंब-कर्जत या फेर्‍यांचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यात नेरळ-कळंब मार्गावर सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत बस धावणार आहेत.

- Advertisement -

४ सप्टेंबरपासून कळंब, ओलमण मार्गावर गाड्या सुरू झाल्या आहेत आणि शासनाचे कोरोना निर्बंधाचे नवीन आदेश येईपर्यंत त्या सुरू राहतील. या मार्गावर पहिल्या टप्प्यात ८ फेर्‍या होणार आहेत.
– शंकर यादव, कर्जत आगार प्रमुख


हे ही वाचा – करुणा शर्मा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी


- Advertisement -

 

- Advertisement -