घरताज्या घडामोडीकाशीद पुलावरून एसटी वाहतूक सुरू करावी;सार्वजनिक बांधकाम विभागाचे तहसीलदारांना पत्र

काशीद पुलावरून एसटी वाहतूक सुरू करावी;सार्वजनिक बांधकाम विभागाचे तहसीलदारांना पत्र

Subscribe

पुलावरून एकेरी वाहतूक पद्धतीने एसटी प्रवासी वाहतूक दिलेल्या अटी आणि शर्थीच्या अधीन राहून सुरू करण्यास हरकत नाही.

मुरुड तालुक्यातील काशीद पुलावरून एसटी प्रवासी वाहतूक सुरू करण्यात यावी, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुरुड येथील उप अभियंत्यांनी तहसीलदारांना पत्र दिले आहे.गेल्या महिन्यात मुसळधार पावसात हा पूल कोसळला होता. त्याची युद्धपातळीवर उभारणी करण्यात आली असली तरी तेथून फक्त छोटी वाहनेच जा- ये करू शकतात. तर विहूर आणि चिकणी या पुलावरूनही एसटी वाहतूक बंद आहे. उप अभियंत्यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विहुर पूल आणि चिकणी पुलावरून एकेरी वाहतूक पद्धतीने एसटी प्रवासी वाहतूक दिलेल्या अटी आणि शर्थीच्या अधीन राहून सुरू करण्यास हरकत नाही.

अतिवृष्टीच्यावेळी, हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर, तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास एसटी प्रवासी वाहतूक बंद ठेवावी. याशिवाय पुलावरून एकेरी वाहतूक पद्धतीने प्रवासी वाहतूक करीत असताना प्रति किलोमीटर दहा किलोमीटर वेगमर्यादेचे उल्लंघन होऊ नये, अशीही सूचना पत्रात करण्यात आली आहे. काशीद पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने त्यावरून एसटी वाहतूक सुरू ठेवण्यास हरकत नसल्याचेही पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसीलदारांना दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Local Online Pass: लोकल प्रवाशांसाठी ऑनलाईन ई-पास सेवा सुरु, ‘असा’ मिळवा ई-पास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -